वृत्तसंस्था
मुंबई : भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या स्मरकावरून सुरु झालेला वाद थांबवा, असे आवाहन त्यांचे बंधू हृदयनाथ मंगेशकर यांनी केले आहे. लतादीदींच्या पार्थिवाववर शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर आता लतादीदींचे स्मारक तयार करण्याची मागणी होत आहे. Stop arguing over Lata Mangeshkar’s memorial; Hridaynath Mangeshkar’s appeal to the parties
ज्या ठिकाणी लतादीदींवर अंत्यसंस्कार करण्यात आले तेथेच स्मारक उभारावे, अशी मागणी भाजपचे आमदार राम कदम यांनी केली. आता हृदयनाथ मंगेशकर यांनी स्मारकाच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया देत संपूर्ण वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. राजकारण्यांनी स्मारकाचा वाद थांबवावा, अशा शब्दात त्यांनी प्रतिक्रिया दिली.
आंतरराष्ट्रीय संगीत विद्यापीठ हीच दीदींना खरी श्रद्धांजली ठरेल, असेही ते म्हणाले. शिवाजी पार्कात लतादीदींचे स्मारक व्हावे अशी इच्छा नाही, असेही त्यांनी सांगितले. कॉंग्रेस आणि भाजपने स्मारक शिवाजी पार्कातच व्हावे, अशी मागणी केली होती. शिवसेनेकडून पाठिंबा देण्यात आला नव्हता. तर मनसे आणि वंचित बहुजन आघाडीने शिवाजी पार्कातील स्मारकाला विरोध केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App