मिरज कोल्हापूर एसटीवर अज्ञातांनी केली दगडफेक


विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : राज्यात सर्वत्र एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. मागण्या मान्य करण्यासाठी गेल्या सात दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. या पाश्र्वभूमीवर कोल्हापूरमधील एकूण 53 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यानिमित्त कर्मचारी आधीपासूनच संतप्त आहेत. कर्मचार्यांनी एसटी डेपोमध्ये सत्यनारायणाची पूजा केली जेणेकरून सरकारला सुबुद्धी यावी.

Stones were hurled at Miraj Kolhapur ST by unknown persons

तर आता आणखी एका माहितीनुसार कोल्हापूर सांगली रोडवर मिरज कोल्हापूर एसटीवर अज्ञातांनी दगडफेक केली आहे. ही दगडफेक करून हल्लेखोर पळून गेले आहेत. या दगडफेकीमध्ये एसटीचे चालक मात्र जखमी झालेले आहेत. एसटी चालकांवर उपचार सुरु असून लवकरच त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळणार आहे. ही घटना घडल्यानंतर शिरोली MIDC पोलिस ठाण्यातील आणि हातकणंगले पोलीस ठाण्यातील पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.


निजामशाहीमुळे ST कर्मचाऱ्यानं आत्महत्येचा मार्ग स्वीकारला तर याला ठाकरे सरकार जबाबदार राहील – आमदार गोपीचंद पडळकर


जिल्ह्यातील सर्व आगारातील एसटी सेवा बंद असून प्रवासी वाहतुकीसाठी खासगी वाहनांचा वापर करून होताना दिसून येत आहेत. या पार्श्वभूमीवर आज या बसवर झालेला हल्ला हा अतिशय दु खद आहे.

Stones were hurled at Miraj Kolhapur ST by unknown persons

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात