शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्या सिंधुदूर्ग येथील बंगल्यावर दगडफेक


विशेष प्रतिनिधी

सावंतवाडी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच पेटले आहे. राणे यांना न्यायालयाकडून जामीन मंजूर झाल्यानंतर शिवसेना नेते खासदार विनायक राउत याच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळगाव मालवण येथील बंगल्यावर अज्ञात व्यक्तीनी सोड्याच्या बाटल्या तसेच दगडफेक केली. Stone pelting on Shiv Sena MP Vinayak Raut’s bungalow at Sindhudurg

ही घटना मंगळवारी रात्री उशिरा करण्यात आली असून चार ते पाच व्यक्ती दुचाकीने आल्या होत्या असे राऊत यांच्या निकटवतीर्यानी सांगितले सर्व जण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. राऊत सध्या दिल्ली येथे असून त्यांनी राणेंच्या वक्तव्याबाबत जोरदार टिका करत पंतप्रधानांना पत्र लिहून राणेचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी केली होती. त्यासाठी त्यांनी पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहिले होते. मात्र, पंतप्रधान कार्यालयाने राऊत यांच्याशी संपर्क साधून याबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांशी संपर्क साधण्यास सांगितले होते.

पोलीसांकडून या अज्ञात व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. नारायण राणे यांच्या अटकेचे पडसाद सिंधुदुर्ग जिल्ह्यात उमटत असल्याचे दिसून येत असून पोलीसांकडून सर्वत्र कडक बंदोबस्त ठेवण्यात येत आहे.

Stone pelting on Shiv Sena MP Vinayak Raut’s bungalow at Sindhudurg

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात