विशेष प्रतिनिधी
मुंबई : देशातील दुसरी सर्वात मोठी माहिती तंत्रज्ञान कंपनी असलेल्या इन्फोसिसचे शेअर्स उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. शेअर्सची किंमत वाढल्याने कंपनीचे बाजारमूल्य १०० बिलीयन डॉलर्स म्हणजे ७.४५ लाख कोटी रुपये झाले आहे. Infosys is now 100 billion company , market capitalization at Rs 7.45 crore
रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि एचडीएफसी बँकेनंतर १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये प्रवेश करणारी इन्फोसिस भारताची चौथी कंपनी ठरली आहे, असे स्टॉक एक्सचेंजच्या आकडेवारीवरून दिसून आले. या वर्षी आतापर्यंत इन्फोसिसचे शेअर्स ४० टक्यांनी वाढले आहेत. सेन्सेक्सने आत्तापर्यंत १६.६ टक्क्यांनी प्रगती केली आहे. इन्फोसिसच्या शेअर्सची किंमत १७५५.६० रुपये झाली आहे.
कोरोना साथीमुळे सध्या डिजिटायझेशन आणि क्लाऊड कॉम्प्युटिंगचे महत्व वाढले आहे. त्यामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये सातत्याने वाढ होत आहे. आयटी कंपन्यांच्या व्यवसायाला चालना मिळाली आहे.त्यामुळे इन्फोसिसच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. जागतिक शेअर बाजारातही इन्फोसिसचे शेअर्स तेजीत आहेत. इन्फोसिसचे सह-संस्थापक एस डी शिबुलाल यांनी त्यांची हिस्सेदारी वाढवित १०० कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more