नगरसेवक ते मुख्यमंत्री : ठाण्यातून सुरू झाली, मंत्रालयात सहाव्या मजल्यावर पोहोचली; एकनाथ शिंदेंची २५ वर्षांची कारकीर्द!!


प्रतिनिधी

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री कोण होणार याकडे साऱ्याचे लक्ष लागले होते. भाजपचे देवेंद्र फडणवीस हे शपथ घेतील अशी चर्चा असताना महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे असतील अशी घोषणा स्वतःच देवेंद्र फडणवीस यांनी केली. Started from Thane, reached the sixth floor of the Ministry

एकनाथ शिंदे हे नेमके आहे तरी कोण?

  • शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात एकनाथ शिंदे यांना १९९७ हे वर्ष अत्यंत लकी ठरले. यावर्षीच आनंद दिघेंनी ठाणे महापालिका निवडणुकीचे तिकीट दिले. या निवडणुकीत शिंदेंचा दणदणीत विजय झाला.
  • शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रभावामुळे १९८० मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
  • साधा एक शाखा प्रमुख या पदापासून एकनाथ शिंदे यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरूवात झाली.
  • एकनाथ शिंदे ठाणे महापालिकेचे सभागृह नेतेही झाले. सभागृह नेते म्हणून त्यांनी पालिका गाजवली. त्यानंतर २००४ मध्ये त्यांनी विधान सभेची निवडणूक लढवली. पहिल्याच विधानसभा निवडणुकीत ते निवडून आले.
  • २००४ मध्ये एकत्रित ठाणे विधानसभा मतदारसंघातून ते विधानसभेत निवडून आले होते.
  • २००९, २०१४ आणि २०२१ मध्ये ठाण्यातील कोपरी-पांचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून ते सलग तीन वेळा विधानसभेत पोहोचले. म्हणजेच चार वेळा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवत विधानसभेमध्ये पोहोचले.
  • २०१९ च्या सुरूवातीला त्यांनी आरोग्य खात्याची जबाबदारी सांभाळली होती.
  • एकनाथ संभाजी शिंदे शिवसेनेचे नेते असून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच नगर विकास आणि सार्वाजनिक बांधकाम या खात्याचे कॅबिनेट मंत्री आहेत.
  • १९९७ आणि २००२ दोन वेळा नगरसेवक, ३ वर्षे स्थायी समिती सदस्य, ४ वर्षे सभागृह नेता, महानगरपालिका ठाणे.
  • २००४, २००९, २०१४, २०१९ या वर्षी चार वेळा आमदार
  • २०१४ ते २०१९ विधीमंडळ शिवसेना पक्षाचे गटनेते
  • १२ नोव्हेंबर २०१४ ते ५ डिसेंबर २०१४ विधानसभा विरोधी पक्ष नेता
  • ५ डिसेंबर ते नोव्हेंबर २०१९ सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री
  • जानेवारी २०१९ सार्वजनिक आरोग्य खात्याचा कार्यभार व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री
  • ऑक्टोबर २०१९ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड. डिसेंबर २०१९ पासून शिवसेनेचे गटनेते
  • नोव्हेंबर २०१९ पासून नगर विकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) खात्याचे मंत्री.
  • 30 जून 2022 महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री

Started from Thane, reached the sixth floor of the Ministry

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात