विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचं (MSRTC) राज्य शासनामध्ये (Maharashtra Government) विलीनीकरण करावं या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप अजूनही सुरुच आहे.काही ठिकाणी संप मागे घेण्यात आला तर 74 हजार कर्मचारी अद्याप संपात सहभागी आहेत. ST Strike: Strict action against contact ST employees from today! 74,000 employees still participating in strike
सरकारने पगारवाढ केली आहे मात्र एसटी कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम असून संप सुरुच ठेवला आहे.संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना सरकारने कारवाई करण्याचा इशारा दिला तरी सुद्धा त्यांनी संप मागे घेतला नाही. सेवा समाप्ती आणि निलंबनाच्या कारवाईला आम्ही घाबरणार नाही अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.
परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना शनिवारपर्यंत कामावर रुजू व्हा नाही तर कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे आजपासून या एसटी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यास सुरुवात होणार आहे.
राज्यातील अनेक ठिकाणी एसटी बसेसवर दगडफेक करण्यात आली. कोल्हापूर, सांगली , बीड आणि अहमदनगरमध्ये बससेवा काही प्रमाणात सुरु झाली आहे.
अहमदनगरमध्ये बसवर दगडफेक करण्यात आली. शनिवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत 936 एसटी बस धावल्या. त्यामुळे प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. पण अनेक भागात एसटी सेवा बंद असल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App