विज्ञानाची गुपिते : आता चक्क पाण्याशिवायही अंडी उकडा


थंडीच्या दिवसांत अंडी नियमित खाल्ली जातात. अंडी उकडण्यासाठी पाणी हे लागतेच तसेच वेळही बराच लागतो. मात्र आता चक्क पाण्याशिवायही अंडी उकडली जातील अशा प्रकारचा पुठ्ठयाचा बॉक्स रशियन संशोधकांनी बनवला आहे.Now boil eggs without much water

या पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये अंडे ठेवले की ते अवघ्या दोन मिनिटात उकडून निघते. या अनोख्या पेटीची रचनाच वेगळी आहे त्यामुळे हे साध्य होते. या बॉक्सला चारही बाजूने रासायनिक थर देण्यात आल्याने यात अंडे ठेवल्यानंतर उष्णता निर्माण होते आणि अंडे उकडते. गागल मागल असे या जादुई बॉक्सचे नाव आहे.

केआयएएन या रशियन संशोधकांच्या गटाने ही पेटी बनवली आहे. याची बाहेरील बाजू अंडी ठेवण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या पुठ्ठयाने बनवलेली आहे. त्याचबरोबर आणखी तीन प्रकारच्या थरांनी हा बॉक्स बनलेला आहे. त्यातील एक थर कॅल्शियम हायड्रोक्साइड तर दुसरा एक रासायनिक थर आहे.

तिसरा थर हा पाण्याचा थर आहे. अशा एकूण चार थरांनी बनलेला हा बॉक्स दोन मिनिटांमध्ये अंडे उकडणार आहे. या आधी या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर हा सॉसेजेस आणि शेंगभाज्या उकडवण्यासाठी केला जात असे. अशा प्रकारे रासायनिक पद्धत वापरून उष्णता निर्माण करण्याला एक्झोथर्मिक रिअॅजक्शन असे म्हणतात. ही पद्धत अशा प्रकारे पहिल्यांदाच अंडे उबवण्यासाठी केली जात आहे.

या बॉक्समध्ये अंडे ठेवल्यानंतर ते बंद केले जाते. त्यानंतर लगेचच ही प्रक्रिया सुरू होते. बॉक्स बंद केल्यानंतर तीन मिनिटे ही प्रक्रिया सुरू राहते. अंडे जास्त उकडलेले हवे असेल तर तीन मिनिटांनंतरही ते उघडू शकतो. हा बॉक्स फक्त एक अंडे उकडले की फेकून द्यावा लागतो. त्याचा पुनर्वापर शक्य नाही. मात्र पुनर्वापर करता येणाऱ्या सामग्रीपासून हा बॉक्स बनवण्यात आल्यामुळे टाकाऊ कचऱ्याची निर्मिती कमी प्रमाणात होते. कॅल्शियम हायड्रोक्साइड आणि पाण्याच्या वापरामुळे उष्णता निर्माण होते. ज्यावेळी तुम्ही बॉक्स बंद करता त्यावेळी रासायनिक प्रक्रिया घडून येऊन अंडय़ाला उष्णता मिळते आणि अंडे उकडते.

Now boil eggs without much water

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण