भुजबळ म्हणाले की , ” राज्य सरकारने दोन वर्षात चांगल काम केलं आहे आणि मी या कामावर समाधानी आहे. Chhagan Bhujbal mocks Rane’s statement; Said – We have to find out where Narayan Rane’s march is
विशेष प्रतिनिधी
पुणे : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी येत्या मार्चमध्ये भाजपचं सरकार स्थापन होणार, असं म्हटलं होतं. राणेंच्या या विधानाची राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी खिल्ली उडवली आहे.नारायण राणेंचा मार्च कुठला ते शोधावं लागेल, अशा शब्दात छगन भुजबळ यांनी राणेंच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे.
आज छगन भुजबळ पुण्यात बोलत होते. यावेळी मीडियाने भुजबळांना नारायण राणेंच्या भविष्यवाणीबाबत त्यांना विचारले होते. तेव्हा त्यावर बोलताना भुजबळ यांनी वरील प्रतिक्रिया दिली केली.
भुजबळ म्हणाले की , ” राज्य सरकारने दोन वर्षात चांगल काम केलं आहे आणि मी या कामावर समाधानी आहे.पण आता नारायण राणेंनी मार्चची डेडलाईन दिली तर आहे. पण आता त्यांचा नेमकं मार्च कुठला ते शोधावं लागेल. आताचा २०२२ चा मार्च का त्याच्या पुढचा मार्चही जाईल किंवा पाच वर्षही होतील. पण तो मार्च काही येणार नाही कारण महाविकास आघाडी मजबूत राहील. महाविकास आघाडी पुढेही मजबूत राहील, असं भुजबळांनी सांगितलं.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App