कामावर हजर होणाऱ्या कर्मचाऱ्यांना धमकाविणाऱ्या ११ संपकरी कर्मचाऱ्यांना भद्रकाली पोलिसांनी ताब्यात घेतले.ST STRIKE: Police arrested 11 liaison officers in Nashik
विशेष प्रतिनिधी
नाशिक : बुधवारी (ता. १२) कंत्राटी कर्मचारी नियुक्त करून त्यांच्याद्वारे बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.शिवाय संपकरी कर्मचाऱ्यांनी काही कर्मचारी पुन्हा कामावर हजर होण्यास तयार झाले होते.अशा कर्मचाऱ्यांना कामावर हजर होऊ नये, असे धमकावले जात होते.
कामावर हजर होणाऱ्या कर्मचाऱ्यांना धमकाविणाऱ्या ११ संपकरी कर्मचाऱ्यांना भद्रकाली पोलिसांनी ताब्यात घेतले.यात कैलास कुठे, नीलेश खैरे, महिंद्र तेजाळे, आवेश शेख, जगनसिंग झाला, ईश्वर वनसे, कैलास कराड, शशिकांत ढेपले, राजाराम मथुरे, भूषण चौक, रवींद्र निकाळे यांचा समावेश आहे.
गंगापूर पोलिसांनी चार, सरकारवाडा पोलिसांनी तीन, मुंबई नाका पोलिसांनी तीन, तर भद्रकाली पोलिसांनी एक, अशा ११ जणांना ताब्यात घेतले.यामुळे आंदोलन ठिकाणी काहीवेळ तणाव निर्माण झाला.
याबाबत भाजप पदाधिकाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी पोलिस ठाणे गानू पोलिसांच्या कारवाईचा विरोध दर्शविला.त्यांचा काही संबंध नसताना त्यांना घरातून ताब्यात घेतले. त्यांना सोडण्याची मागणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App