विशेष प्रतिनिधी
पुणे: पुणे रेल्वे स्थानक परिसरातून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरणकरून रेल्वेतील दोन कर्मचारी तसेच रिक्षा चालकांनी सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे.Six rickshaw drivers and two railway employees arrested for gang-raping a 13-year-old girl in Wanwadi area
याबाबत १३ वर्षीय पिडीत मुलीने वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत हा प्रकार घडला. पिडीत मुलगी ३१ ऑगस्ट रोजी गावी जाण्यासाठी पुणे रेल्वे स्थानक परिसरात आली होती. रात्री तिला आरोपींनी आता गाडी नाही.
तू गावी कशी जाणार असे म्हणत आम्ही तुझी राहण्याची व्यवस्था करतो, असे सांगून बाहेर आणले. तिला वानवडी परिसरात नेले. त्याठिकाणी आरोपींनी रात्री तिच्यावर बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी देखील तिच्यावर बलात्कार करण्यात आला. एकूण ७ आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला.
हा प्रकार रविवारी उघडकीस आला. त्यानंतर वानवडी पोलीसांनी आरोपींचा शोध घेत त्यांना अटक केली आहे. यामध्ये रेल्वेच्या दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. इतर आरोपी रिक्षा चालक आहेत. त्यांना सहाय्य करणाऱ्यांचा देखील पोलीस शोध घेत आहेत. ८ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App