बेळगाववर भगवा फडकला, राऊत खरे बोलले… पण शिवसेना हिंदुत्वापासून ढळलीय त्याचे काय…??; आशिश शेलारांचा बोचरा सवाल


प्रतिनिधी

मुंबई – बेळगाववर भगवा फडकेल, असे संजय राऊत म्हणाले होते. ते खरेच बोलले होते. पण भगवा भाजपचा फडकलाय… शिवसेना हिंदुत्वापासून दूरच गेलीय, अशी बोचली टीका भाजपचे नेते आमदार आशिश शेलार यांनी केली आहे. Ashish Shelar’s question

बेळगाव महापालिका निवडणुकीत भाजपाच्या विजयानंतर आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारवर टीकाटिप्पणी तर केलीच शिवाय शिवसेना खासदार संजय राऊत यांना शेलक्या शब्दांत टोलाही लगावला आहे.

पत्रकार परिषदेत शेलार म्हणाले, की बेळगावचे नेते, जनता आणि कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो. या निवडणूकीत भगवा फडकेल असे शिवसेनेचे नेते संजय राऊत अगोदर बोलले होते. ते खरेच बोलले असेच मी म्हणेन. कारण खरा भगवा भाजपाकडेच आहे हे आता स्पष्ट झालेय. एवढीच प्रतिक्रिया देईन”.

सामन्यातल्या अग्रलेखात हिंदुत्वाविषयी केलेल्या भाष्याबद्दल विचारले असता आशिश शेलार म्हणाले, की मी आत्ताच म्हणालो की संजय राऊत हळुहळू खरे बोलायला लागले आहेत.पण कधी कधी आपल्या मित्रपक्षांच्या मालकांना खूश करायला थोडा यूटर्न घेतात. आणि त्या यूटर्नमध्ये शिवसेना आता हिंदुत्वापासून सरकलीय हे लपवण्याचा अतिशय आटोकाट प्रयत्न करतात.

पण टिपू सुलतान जयंतीपासून बेहराम पाड्यात जिंकण्यापर्यंत, गोविंदांवर केसेस टाकण्यापासून गणेशोत्सव आणि मंदिरांच्या बंदीपर्यंत जे काही राष्ट्रवादीला आणि काँग्रेसला अपेक्षित आहे तेच शिवसेना करतेय आणि म्हणून आपल्या हातातून भगवा निसटलाय हे जाणवल्यानंतर ते हिंदुत्वावर बोलायला लागतेल. पण त्यांचा शिवसेनेचे हिंदुत्व दाखविण्याचा प्रयत्न वायफळ आहे.

Ashish Shelar’s question

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण