NEET UG परीक्षा रविवारी होणार, सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती मागणारी याचिका फेटाळली


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : NEET परीक्षा रविवारी देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर घेतली जाईल. सीबीएसई कंपार्टमेंट, खासगी परीक्षांच्या घोषणेनंतर NEET UG 2021 परीक्षेला स्थगिती आणि पुनर्निर्धारण करण्याची मागणी करणारी रिट याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली. वेळापत्रकानुसार 12 सप्टेंबर रोजी परीक्षा होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.Supreme Court Rejects Request To Delay Exam NEET To Be Held On Sunday

या प्रवेश परीक्षेमुळे इतर परीक्षांवर परिणाम होईल, असा युक्तिवाद करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या एका गटाची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आणि म्हटले की, “16 लाख विद्यार्थी नीट परीक्षेला बसतात. काही विद्यार्थ्यांच्या विनंतीवरून हे टाळता येत नाही.”न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर, न्यायमूर्ती हृषीकेश रॉय आणि न्यायमूर्ती सीटी रविकुमार यांच्या खंडपीठाने सांगितले की, आम्ही या याचिकेवर विचार करणार नाही. आम्हाला अनिश्चितता नको आहे. परीक्षा होऊ द्या.” राष्ट्रीय चाचणी एजन्सीने 3 सप्टेंबर रोजी खंडपीठाला स्पष्ट केले की, सीबीएसईचा निकाल तोपर्यंत जाहीर होणार नाही असे असूनही विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाईल. निकाल घोषित न केल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यापासून वंचित राहणार नाहीत आणि निकाल केवळ समुपदेशनादरम्यानच मागितले जातील,” असे एनटीएने म्हटले आहे.

NEET UG प्रवेशपत्र या तारखेला येईल

राष्ट्रीय चाचणी एजन्सी (NTA) 9 सप्टेंबर 2021 रोजी NEET 2021 प्रवेशपत्र जारी करेल अशी अपेक्षा आहे. अधिकृतपणे, प्रवेशपत्र जारी करण्याची तारीख स्पष्ट नाही. तथापि, NEETच्या अधिसूचनेमध्ये नमूद करण्यात आले आहे की प्रवेशपत्र परीक्षेच्या तारखेच्या तीन दिवस आधी दिले जाईल. या वर्षी NEET UG 12 सप्टेंबर 2021 रोजी घेण्यात येणार आहे, म्हणून प्रवेशपत्र 9 सप्टेंबर रोजी जारी केले जाईल.

दरम्यान, नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने सांगितले की, मध्यपूर्व देशांमध्ये राहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ही नवीन केंद्रे कुवेत आणि दुबईमध्ये सुरू करण्यात आली आहेत. ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा MBBS आणि BDS सारख्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही परीक्षा इतर 11 भाषांसह पंजाबी आणि मल्याळममध्ये घेतली जाईल.

Supreme Court Rejects Request To Delay Exam NEET To Be Held On Sunday

विशेष प्रतिनिधी

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण