NEET-PG स्थगित, मेडिकल इंटर्न कोविड ड्युटीवर पाठवणार; १०० दिवस सेवा बजावणाऱ्यांचा सन्मान, PM मोदींचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय

NEET-PG exams postponed, medical interns to be sent on covid duty; PM Modi Key decisions to Fight Corona

NEET-PG exams : कोरोना महामारीमुळे देशात सध्या सुरू संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत, अनेक महत्त्वाच्या निर्णयांना मंजुरी दिली आहे. यानुसार, कमीत कमी चार महिन्यांसाठी NEET-PG परीक्षा स्थगित करण्याची घोषणा केली आहे. जेणेकरून महामारीच्या काळात आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता भासू नये आणि मेडिकल इंटर्नसह क्वालिफाइड डॉक्टर मोठ्या संख्येने उपलब्ध होतील. आता ही परीक्षा 31 ऑगस्टनंतरच होईल. NEET-PG exams postponed, medical interns to be sent on covid duty; PM Modi Key decisions to Fight Corona


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोना महामारीमुळे देशात सध्या सुरू संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत, अनेक महत्त्वाच्या निर्णयांना मंजुरी दिली आहे. यानुसार, कमीत कमी चार महिन्यांसाठी NEET-PG परीक्षा स्थगित करण्याची घोषणा केली आहे. जेणेकरून महामारीच्या काळात आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता भासू नये आणि मेडिकल इंटर्नसह क्वालिफाइड डॉक्टर मोठ्या संख्येने उपलब्ध होतील. आता ही परीक्षा 31 ऑगस्टनंतरच होईल.

रविवारी पंतप्रधान मोदींनी आरोग्य तज्ज्ञांशी व्हर्च्युअल बैठक घेतली. यात हे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. हे लक्षात घेण्यासारखे आहे की कोविड ड्यूटीवर तैनात करण्यात येणारे मेडिकल स्टुडंट्स व डॉक्टरांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे.

सोमवारी पीएमओने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एमबीबीएसच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनाही या कामासाठी तैनात करता येईल. पीएमओच्या म्हणण्यानुसार, कोविड ड्युटीचे 100 दिवस पूर्ण करणाऱ्या आरोग्य सेवकांना नियमित सरकारी भरतीत प्राधान्य दिले जाईल. त्यात असेही म्हटले आहे की, बीएस्सी आणि जीएनएम पात्र नर्सेसची एक टीम ज्येष्ठ डॉक्टरांच्या देखरेखीखाली कोविड नर्सिंग ड्युटीसाठी तैनात केली जाऊ शकते. पीएमओ म्हणाले की, नियमित वैद्यकीय भरतीमध्ये 100 दिवस कोविड ड्यूटी पूर्ण करणाऱ्या कर्मचार्‍यांना प्राधान्य दिले जाईल. त्यांच्या विद्याशाखेंतर्गत कोविड व्यवस्थापन कार्यांसाठी वैद्यकीय इंटर्न तयार केले जातील.

पीएमओने म्हटले की, एमबीबीएसच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनाही सौम्य लक्षणे असणाऱ्या कोरोना रुग्णांच्या देखरेखीसाठी नियुक्त केले जाईल. त्यांचे प्राध्यापक या कामावर देखरेख ठेवतील. त्याचबरोबर कोविड ड्यूटीवर तैनात असलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून 100 दिवस काम पूर्ण केल्यावर पंतप्रधानांतर्फे कोविड राष्ट्रीय सेवा पुरस्काराने सन्मानित केले जाईल. या सर्वांचा शासनाच्या विमा योजनेतही समावेश करण्यात येणार आहे.

NEET-PG exams postponed, medical interns to be sent on covid duty; PM Modi Key decisions to Fight Corona

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात