सिंधुताई सपकाळ यांच्या मुलीला झाली कोरोणाची लागण


  • ममता या सिंधुताई सपकाळ यांच्या अंत्यसंस्कारावेळी उपस्थित असल्याने आता अधिक चिंता वाढली आहे. Sindhutai Sapkal’s daughter contracted corona

विशेष प्रतिनिधी

पुणे : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां सिंधुताई सपकाळ (७४) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मंगळवारी निधन झाले. त्यानंतर तीन दिवसांनी त्यांची मुलगी ममता सिंधुताई यांना करोनाची लागण झाल्याचं समोर येत आहे. ममता या सिंधुताई सपकाळ यांच्या अंत्यसंस्कारावेळी उपस्थित असल्याने आता अधिक चिंता वाढली आहे.अंत्यसंस्कारासाठी आणि सिंधुताईंना अखेरचा निरोप देण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.त्यामुळे रुग्ण संख्या वाढण्याची शक्यता आहे.ममता सिंधुताई यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे. आपली करोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून आपल्या संपर्कात आलेल्या इतरांनी काळजी घेण्याचं आवाहन ममता यांनी केलं आहे.

Sindhutai Sapkal’s daughter contracted corona

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण