शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंची न्यूमोनियानंतर प्रकृती चिंताजनक, सध्या व्हेंटिलेटरवर, मंगेशकर रुग्णालयात उपचार

Shivshahir Babasaheb Purandare Admitted In Deenanath Mangeshkar Hospital In Pune Condition Is Critical

Shivshahir Babasaheb Purandare : प्रख्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्यावर रुग्णालयातील डॉक्टरांचे एक पथक उपचार करत असून सध्या त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. डॉक्टरांनी नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार त्यांना न्यूमोनियाचे निदान झाले असून त्यांना सध्या व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेलं आहे. Shivshahir Babasaheb Purandare Admitted In Deenanath Mangeshkar Hospital In Pune Condition Is Critical


प्रतिनिधी

पुणे : प्रख्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्यावर रुग्णालयातील डॉक्टरांचे एक पथक उपचार करत असून सध्या त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. डॉक्टरांनी नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार त्यांना न्यूमोनियाचे निदान झाले असून त्यांना सध्या व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेलं आहे. काही दिवसांपूर्वी पाय घसरून पडल्याने पुरंदरे यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. काही दिवसांपूर्वीच ते दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, पुरंदरे यांचे सुपुत्र अमृत पुरंदरे यांच्या कोथरूड येथील घरात ते पाय घसरून पडले. त्यावेळी त्यांच्या डोक्याला इजा झाली. आज साडेआठच्या सुमारास रुग्णालयाकडून मेडिकल बुलेटीन येत असून त्यानंतर त्यांच्या तब्येतीबाबत अधिक माहिती मिळणार आहे.

बाबासाहेब पुरंदरे यांनी नुकतेच केले १००व्या वर्षात पदार्पण

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी २९ जुलै २०२१ रोजी वयाच्या १००व्या वर्षात पदार्पण केले आहे. यानिमित्त पुण्यातील कात्रज येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले उपस्थित होत्या.

Shivshahir Babasaheb Purandare Admitted In Deenanath Mangeshkar Hospital In Pune Condition Is Critical

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात