शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी : शंभरीच्या कुंपणातच उन्मळून पडलेली राजकीय महत्त्वाकांक्षा!!


“वचने कीं दरिद्रता”, असे संस्कृत वचन आहे. म्हणजे निदान बोलण्यात तरी कमीपणा किंवा उणीव किंवा आखूडपणा का ठेवायचा?, बोलताना तरी पूर्ण बोलावे म्हणजे थोडक्यात महत्त्वाकांक्षा तरी उंच ठेवावी, असा याचा अर्थ आहे. Shivsena Thackeray group – NCP : political ambitions fly under 100 seats in maharashtra legislative assembly polls

– शिवसेना-भाजप 200 महत्त्वाकांक्षा

शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि भाजप यांनी एकत्र येऊन अडीच वर्षांनंतरच्या विधानसभा निवडणुकीत 200 जागा निवडून आणण्याची महत्त्वकांक्षा ठेवली आहे. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच विधानसभेत तसे जाहीर केले आहे. त्याला देवेंद्र फडणवीस यांनी दुजोराही दिला आहे. आता यात नेमके कुणाचे किती हा भाग वेगळा पण एकत्र येऊन 200 चा आकडा पार करण्याची तरी त्यांची जाहीर महत्त्वाकांक्षा आहे.

– ठाकरे गट राष्ट्रवादी 100/100 महत्त्वाकांक्षा

पण याच्या उलट शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचा ठाकरे गट यांची महत्त्वाकांक्षा महाराष्ट्राच्या विधानसभेत स्वबळावर पूर्ण बहुमत मिळवण्याची सुद्धा नाही. दोन्ही पक्षांनी आपापली महत्त्वाकांक्षा 100 आकड्यापर्यंत नेऊन भिडवली आहे. शिवाय 100 आकडा गाठला की आपलाच मुख्यमंत्री महाराष्ट्रात सत्तेवर बसविण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा आहे. राजकीय महत्त्वाकांक्षातले जे तोकडेपण आहे, ते इथेच आहे. एक बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने चालणारा पक्ष आणि दुसरा थेट शरद पवार चालवत असलेला पक्ष यांची महत्त्वाकांक्षा स्वतंत्रपणे महाराष्ट्रात स्वबळावर पूर्ण बहुमत मिळवून म्हणजे 145 आमदार निवडून आणून सत्ता मिळवण्याची नाही, हेच स्पष्ट दिसत आहे.

– कुबड्यांशिवाय पर्याय नाही

याचाच दुसरा अर्थ असा की एकमेकांचा आधारे आणि थोडे स्पष्ट बोलायचे झाले तर एकमेकांच्या कुबड्या घेतल्याशिवाय आपण महाराष्ट्रात सत्तेवर येऊच शकत नाही ही त्यांची खात्री दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या वक्तव्यातून दिसून येते आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संकल्प मेळाव्यांमध्ये अनेकदा राष्ट्रवादी काँग्रेस 100 आकडा पार करेल, असे बोलून दाखवले आहे. म्हणजे ते सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर 145 जागा मिळवून सत्तेवर येईल, असे म्हणू शकलेले नाहीत आणि आता जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भर विधानसभेत शिवसेना – भाजप युती 200 जागा मिळवून सत्तेवर येईल असे म्हटले त्याला प्रत्युत्तर देताना शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी ते काय 200 जागा जिंकणार?? आमच्याच शिवसेनेच्या 100 जागा निवडून येतील, असे म्हटले आहे. याचाही अर्थ असाच की शिवसेनेला ठाकरे गटाला स्वतःच्या बळावर 145 जागा निवडून आणण्याची महत्त्वाकांक्षा नाही!!

– प्रादेशिक घराणेशाहीकडे स्ट्रॅटेजिक प्रत्युत्तर नाही

मोदी शहा आणि नड्डा हे भाजपचे केंद्रीय नेतृत्व गेल्या दीड वर्षांपासून सातत्याने प्रादेशिक पक्षांमधल्या घराणेशाहीला टार्गेट करत आहे. प्रत्येक राज्यात जाऊन तिथली घराणेशाही मोडायचा त्यांनी चंग बांधला आहे. यासाठी वाटेल ती स्ट्रॅटेजी आणि साधन संपत्ती वापरण्यास ते मागेपुढे पाहत नाहीत. मग अशावेळी त्याला तोडीस तोड म्हणून प्रादेशिक पक्षांच्या घराणेशाही कडून काही स्ट्रॅटेजी आखून प्रत्युत्तर दिले जात असल्याचे काहीही दिसत नाही. फक्त बोलभांडपणा केला जातो. पक्ष फुटला की आक्रस्ताळ्या प्रतिक्रिया दिल्या जातात हेच दिसून येते. त्यापलिकडे कोणतेही स्ट्रॅटेजी किंवा आपला पक्ष एकजुटीने बांधून ठेवण्याची मजबुती प्रादेशिक पक्ष दाखवू शकलेले नाहीत.

– केंद्रीय नेतृत्व कर्तृत्ववान नव्हे, तर प्रादेशिक नेतृत्व तोकडे

…आणि त्या पलीकडे जाऊन निदान महत्त्वाकांक्षा उंच ठेवावी. राज्यात स्वबळावर पूर्ण बहुमत मिळवून सत्ता खेचून आणण्याची असावी असे देखील दिसत नाही. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांच्या दोघांच्याही वक्तव्यातून महत्त्वाकांक्षेचे तोकडेपण स्पष्ट दिसतेच, पण प्रादेशिक पक्षांची झेप तर सोडाच मूळ महत्त्वाकांक्षाचा शंभरीच्या कुंपणात उन्मळून पडलेली दिसत आहे. महाराष्ट्राच्या राजकीय भूमीत भाजपची महत्त्वाकांक्षा लवकर सफल झालेली दिसणार आहे. पण यामध्ये भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचे राजकीय कर्तृत्व आणि कौशल्यापेक्षा प्रादेशिक नेतृत्वाच्या राजकीय कौशल्य आणि कर्तृत्वाचे तोकडेपण त्याला कारणीभूत ठरणार आहे. ही महाराष्ट्रातल्या मराठी माध्यमांना कितीही अमान्य असली तरी वस्तुस्थिती आहे!!

Shivsena Thackeray group – NCP : political ambitions fly under 100 seats in maharashtra legislative assembly polls

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात