द फोकस एक्सप्लेनर : व्हीप न पाळल्याबद्दल शिवसेनेच्या 14 आमदारांना नोटीस, जाणून घ्या, आदित्य ठाकरेंना सूट का दिली?


विधानसभेच्या फ्लोअर टेस्टदरम्यान पक्षाच्या विरोधात मतदान केल्याबद्दल एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेच्या 14 आमदारांना नोटीस बजावण्यात आली आहे. शिवसेनेच्या 15 आमदारांनी विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात मतदान केले आहे. मात्र, शिंदे गटाच्या वतीने मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी केवळ 14 जणांना नोटीस पाठवली आहे. आदित्य ठाकरे यांना नोटीस पाठवली नाही. याचे कारणही शिंदे गटाकडून देण्यात आले आहे.The Focus Explainer Notice to 14 Shiv Sena MLAs for not following the whip, find out why Aditya Thackeray was exempted?

काल शिंदे गट आणि भाजपला मिळून विधानसभेत बहुमत मिळाले. भाजप-शिंदे गटाच्या बाजूने 164, तर महाविकास आघाडीच्या बाजूने 99 मते विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात पडली. आदित्य ठाकरेंसह पंधरा आमदारांनी विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात मतदान केले. या कारणास्तव चौदा आमदारांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.



पक्षाचा व्हीप न पाळल्याबद्दल 14 आमदारांना नोटीस दिल्याची माहिती देताना शिंदे गटाचे मुख्य व्हीप भरत गोगावले म्हणाले की, ‘आम्ही आदित्य ठाकरेंना नोटीस दिलेली नाही. बाळासाहेब ठाकरे यांचा आम्ही आदर करतो. यामुळेच आम्ही आदित्य ठाकरेंना नोटीस पाठवली नाही.

बाळासाहेब ठाकरेंबद्दल आदर, म्हणून आदित्य वाचले

शिंदे गटाने कारवाई सुरू केल्याने आदित्य वगळता बाकीच्यांच्या अडचणी वाढल्या. भरत गोगावले यांनी शिवसेनेच्या सर्व 55 आमदारांना व्हीप जारी करून विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने मतदान करण्याचे निर्देश दिले होते. शिंदे गटाच्या 40 आमदारांनी विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने मतदान केले. मात्र शिवसेनेच्या (उद्धव गट) 15 आमदारांनी विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात मतदान केल्याने आता शिंदे गटाने त्यांच्यावर कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. आता या कारवाईला ठाकरे गटातून काय प्रतिसाद मिळतो ते पाहावे लागेल.

164 विरुद्ध फक्त 99

राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या बहुमतावर सोमवारी (4 जुलै) शिक्कामोर्तब झाले. नव्या सरकारवरील विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने 164 तर विरोधात फक्त 99 मते पडली. समाजवादी व एमआयएमच्या 3 आमदारांनी तटस्थ भूमिका घेतली. विश्वासदर्शक ठरावाला सर्वपक्षीय 18 आमदार सभागृहात उपस्थित नव्हते. त्यात काँग्रेसच्या 10 सदस्यांचा समावेश आहे.

मध्यावधी निवडणुका होणार नाहीत, मुख्यमंत्री शिंदेंचा विश्वास

सुधीर मुनगंटीवार व भरत गोगावले यांनी नियम 23 अन्वये सकाळी 11 वाजता विश्वासदर्शक ठराव मांडला. त्यावर शिरगणतीने मतदान घेण्यात आले. विश्वासदर्शक ठराव जिंकताच सत्ताधारी बाकांवरून शिवसेना-भाजप युतीच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. जय श्रीराम व भारत माता की जय अशा घोषणांनी सभागृह दुमदुमून गेले. यापूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारला विश्वासदर्शक ठरावाला १७० सदस्यांचा पाठिंबा होता. त्यात अपक्ष व छोट्या पक्षांचा बहुतांश भरणा होता. आज हे आमदार नव्या सरकारच्या बाजूला उभे राहिल्याचे दिसून आले. ‘राज्यात मध्यावधी निवडणुका होणार नाहीत. युतीचे सरकार अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल,’ अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनाची सांगता झाल्यावर दिली.

…अन् अजित पवार झाले विरोधी पक्षनेते

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून निवड झाली. सभागृहात विरोधी बाकांवर सर्वाधिक शिवसेना आमदार आहेत. मात्र, त्यांच्यात दोन गट पडल्याने 53 आमदार असलेल्या राष्ट्रवादीला विरोधी पक्षनेतेपद मिळाले.

The Focus Explainer Notice to 14 Shiv Sena MLAs for not following the whip, find out why Aditya Thackeray was exempted?

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात