व्हिप झुगारणाऱ्या 14 आमदारांवर होणार कारवाई; आदित्य ठाकरेंचे नाव मात्र वगळले


प्रतिनिधी

मुंबई : विधानसभा अध्यक्षांची निवडवणूक जाहीर होताच विधीमंडळाचे शिवसेनेचे पक्ष प्रतोद सुनील प्रभू यांच्याकडून एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदारांना व्हिप जारी केला होता. महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांनाच सर्वांनी मतदान करावे, असा व्हिप आमदारांना देण्यात आला होता.Action will be taken against 14 MLAs who are whipping; Aditya Thackeray’s name was omitted



त्यांनी गाय मारली म्हणून आम्ही वासरु मारणार नाही

त्यानंतर शिंदे गटाकडूनही शिवसेनेच्या आमदारांना राहुल नार्वेकर यांना मतदान करण्यासाठी व्हिप जारी करण्यात आला होता. पण ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटातील 15 आमदारांनी त्यांच्या विरोधात मतदान केले, त्यामुळे व्हिप मोडणाऱ्या आमदारांविरोधात शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार केली आहे. या आमदारांवर कारवाई व्हावी अशी मागणी भरत गोगावले यांनी पत्रात केली आहे. विशेष म्हणजे भरत गोगावले यांनी दिलेल्या पत्रात 14 आमदारांची नावे आहेत. यातून आदित्य ठाकरे यांचे नाव वगळण्यात आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विचारवंत आहेत आणि विचार करुनच त्यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव वगळले आहे, अशी प्रतिक्रिया भरत गोगावले यांनी दिली आहे. त्यांनी गाय मारली म्हणून आम्ही वासरु मारणार नाही, आम्हालाही काहीतरी जाणीव आहे, असेही भरत गोगावले यांनी म्हटले आहे.

Action will be taken against 14 MLAs who are whipping; Aditya Thackeray’s name was omitted

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात