आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर : गुवाहाटी सोडण्यापूर्वी एकनाथ शिंदे गटाची आसाम पूरग्रस्तांना 51 लाखांची मदत!!

प्रतिनिधी

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या गटातील बंडखोर आमदारांना युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मधल्या दोन तीन दिवसात जे टक्केटोणपे मारले होते. त्यामध्ये त्यांनी आसाम मध्ये राहात आहात आणि स्वतःला शिवसैनिक म्हणताय तर आसाममधल्या पूरग्रस्तांना मदत तरी करा, असा टोला मारला होता मात्र. Before leaving Guwahati, Eknath Shinde’s group provided Rs 51 lakh to Assam flood victims

या शाब्दिक टोल्याला आता एकनाथ शिंदे गटाने प्रत्यक्ष कृतीने उत्तर दिले आहे. गुवाहाटी मधले रॅडिसन हॉटेल सोडण्यापूर्वी एकनाथ शिंदे गटाने आसाम मधल्या पूरग्रस्तांसाठी 51 लाखांची मदत मुख्यमंत्री निधीला दिली आहे.आसाम मध्ये प्रचंड पूर असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर आसाममधल्या भाजपा सरकारला शिवसेनेने घेण्याचा प्रयत्न केला होता बंडखोर आमदारांची फाइव्ह स्टार सरबराई करण्यापेक्षा आसाममधल्या जनतेची सेवा भाजप सरकारने केली पाहिजे, असे टोले संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी मारले होते. या टोल्यांना स्वतः एकनाथ शिंदे गटाने कृतीतून प्रत्युत्तर दिल्याचे दिसत आहे

गुवाहाटी सोडण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्व आमदारांनी प्रख्यात कामाख्या देवीचे दर्शन घेतले आणि आसाम मधल्या पूरग्रस्तांना 51 लाख रुपये मदत देण्याचे जाहीर केले. ही मदत मुख्यमंत्री निधी जमा करण्याचा निर्णय आसाम सरकारने घेतला आहे.

Before leaving Guwahati, Eknath Shinde’s group provided Rs 51 lakh to Assam flood victims

महत्वाच्या बातम्या