75 % लोकसंख्या : झारखंडच्या गढवा मध्ये मुस्लिमांनी दबावाने बदलायला लावली शालेय प्रार्थना!!


वृत्तसंस्था

गढवा : झारखंड राज्यातील गढवा या गावात मुस्लिमांची लोकसंख्या 75 % आहे. त्यामुळे मुस्लिम समाजाच्या मागणीनुसारच कायदे कानून बनले पाहिजेत, अशी मागणी करत तेथील मुस्लिम आणि शालेय प्रार्थना बदलायला लावली आहे. In Gadhwa, Jharkhand, Muslims forced school prayers to be changed

गढवा गावातील शाळेचे मुख्याध्यापक युगेश राम यांच्यावर अनेक दिवस गावातले मुस्लिम युवक दबाव आणत होते. शालेय प्रार्थना बदलून टाकण्याची मागणी करून धमक्या देत होते. अखेर त्यांच्या दबावापुढे योगेश राम यांना झुकावे लागले आणि त्यांनी शालेय प्रार्थना “विद्या दान दे” ही बदलून “तू राम तू रहीम” ही प्रार्थना सुरू करायला लागली. इतकेच नाही तर प्रार्थनेच्या वेळी विद्यार्थ्यांना हात जोडून उभे राहायला पण बंदी लादली आहे.

या संदर्भात सुरुवातीला योगेश राम यांनी गावचे सरपंच शफीक अन्सारी यांच्याकडे दाद मागितली. त्यांनी झारखंडच्या शिक्षण मंत्रालयात देखील पत्रव्यवहार केल्या. परंतु, शफिक अन्सार यांनी देखील दबाव वाढवत योगेश राव यांना शालेय प्रार्थना बदलायला भाग पाडले.

– शिक्षण खात्याचे चौकशीचे आदेश

आता झारखंडच्या शिक्षण खात्याने या प्रकाराची दखल घेतली असून शिक्षणाधिकारी मयंक कुमार यांनी या प्रकाराची चौकशी करून योग्य ते आदेश दिले जातील, असे स्पष्ट केले आहे. कोणत्याही दबावापोटी शालेय प्रार्थना बदलणे अथवा शालेय गणवेश बदलणे हे कायद्याच्या विरुद्ध आहे. असा कायदा कोणालाही हातात घेता येणार नाही. तो घेईल त्याच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा मयंक कुमार यांनी दिला आहे.

In Gadhwa, Jharkhand, Muslims forced school prayers to be changed

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था