शिवसेनेत फूट : पवारांच्या दमबाजीवर नारायण राणेंची दरडावणी!!…घर गाठणे कठीण होईल!!


प्रतिनिधी

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बरोबर बंडात सामील झालेल्या बंडखोर आमदारांना महाराष्ट्रात यावंच लागेल, आपल्या बंडाचे परिणाम त्यांना भोगावे लागतील, अशी दमबाजी शरद पवार यांनी केल्यावर या दमबाजीवर भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दरडावत प्रत्युत्तर दिले आहे. बंडखोर आमदारांच्या केसाला जरी धक्का लागला तर घर गाठणे कठीण होईल, असा स्पष्ट इशारा नारायण राणे यांनी ट्विटरवर दिला आहे.Shivsena splits : sharad Pawar targets rebel MLAs, narayan rane counter attacks Pawar

नारायण राणे यांचे ट्विट

शरद पवार हे सर्वांना धमक्या देत आहेत, ‘सभागृहात येऊन दाखवा’, असे ते म्हणत आहेत. ते येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठीण होईल, असे ट्विट करत नारायण राणे यांनी शरद पवारांना इशारा दिला आहे.तसेच आघाडी सरकार हे सोयीसाठी व स्वार्थासाठी तयार झालेले सरकार आहे, त्यामुळे कामाच्या व कार्याच्या बढाया मारू नयेत. काहीजणांनी अनेक वेळा बंडखोरी केली. त्या बंडखोरीचा इतिहास उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. नको त्या क्षणी नको त्या वयात मान्यवरांना धमक्या देणे शोभत नाही, अशा शब्दांतही नारायण राणे यांनी शरद पवार यांना फटकारले आहे.

शरद पवार यांचे विधान

शिवसेनेचे आमदार कुठेही गेले तरी त्यांना राज्यात यावंच लागेल. बंडखोर आमदारांनी घेतलेला निर्णय हा पक्षांतर बंदी कायद्याच्या विरोधात आहे. त्यामुळे त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील, अशा शब्दांत शरद पवार यांनी पत्रकारल परिषद घेत बंडखोर आमदारांना इशारा दिला होता.

Shivsena splits : sharad Pawar targets rebel MLAs, narayan rane counter attacks Pawar

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!