द फोकस एक्सप्लेनर : रविवारपर्यंत स्पष्ट होणार सत्तांतराचे चित्र, पवारांची नवी चाल कोणती? वाचा सविस्तर…


महाराष्ट्रातील अभूतपूर्व सत्तांतरासाठी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील आमदारांचा गट गुरुवारी दुपारनंतर अधिक सक्रिय झाला. रविवार सायंकाळपर्यंतच नवे सरकार सत्तेवर विराजमान करण्यासाठी जोरदारी तयारी चालवली जात आहे. बंडखोर शिंदे यांच्या अत्यंत निकटवर्तीय आमदाराने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडी सरकारमधून शिवसेना बाहेर पडत असल्याचे पत्र शुक्रवारी हे आमदार राज्यपालांना देतील.The Focus Explainer The picture of independence will be clear by Sunday, what is Pawar’s new move Read more

अशा परिस्थितीत आजच्या द फोकस एक्सप्लेनरमध्ये जाणून घेऊयात की, कधीपर्यंत चालणार हा सत्तांतराचा खेळ, पवारांची नवी चाल कोणती? शिंदे त्यावर कशी मात करतील?कधी पर्यंत चालणार सत्तांतराचा खेळ?

एकनाथ शिंदे समर्थकांच्या शिरगणतीचीही तयारी आहे. राज्यपालांच्या भेटीनंतर शिंदे गट विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचीही भेट घेऊन विधीमंडळ गटनेतेपदी शिंदेंच्या निवडीचे पत्र देईल. तेथेही सह्यांची तपासणी, शिरगणती होईल. याशिवाय प्रतोदपदी भारत गोगावलेच असल्याचेही पत्र दिले जाणार आहे.

शुक्रवारी मूळ शिवसेना महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडत असल्याचे पत्र राज्यपालांना दिले जाईल. यानंतर राज्यपालांसमोर शिरगणतीही होईल. नंतर विधानसभा उपाध्यक्षांनाही विधिमंडळ नेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड झाल्याचे पत्र दिले जाणार. तेथेही शिरगणती आणि उपाध्यक्षांनी सूचना केल्यास त्यांच्या समक्षच सह्यांची तपासणी होईल. मूळ शिवसेना गटाच्या प्रतोदपदी गोगावलेंची नियुक्ती केल्याचे शिंदे यांचे पत्र उपाध्यक्षांना सुपूर्द करणार. याच कालावधीत राज्यपाल विधानसभेत आम्हाला शक्तीपरीक्षणाची तारीख देत सूचना करतील. भाजपचे नेतृत्व आणि एकनाथ शिंदे मिळून पुढील 48 तासांची पावले उचलतील व निर्णय घेतील. रविवारी सायंकाळी सत्तांतराचे चित्र पूर्णपणे स्पष्ट होईल.

पवारांची नवी खेळी : बंडखोरांवर अशी होऊ शकते अपात्रतेची कारवाई

विधानसभेचे अध्यक्ष अपात्रतेची कारवाई दोन दिवस ते दोन महिन्यांत कधीही करू शकतात. 2006 मध्ये सहा सदस्यांच्या अपात्रतेची कारवाई अवघ्या तीन दिवसांत करण्यात आली होती. ज्या आमदारांना अपात्र करायचे आहे, त्यांना नोटिसा देणे, त्यांचे म्हणणे ऐकून घेणे आणि त्यावर निर्णय देणे अशी याची प्रक्रिया असते.

या निर्णयास अनेकदा न्यायालयात आव्हान दिले जाते. मात्र न्यायालय बऱ्याच वेळा निर्णय देत नाही किंवा त्यात मोठा कालावधी जातो. एकनाथ शिंदे यांचा 36 सदस्यांचा स्वतंत्र गट होऊ नये यासाठीच पहिल्या टप्प्यात 12 सदस्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे. या कारवाईमुळे एकनाथ शिंदे यांचा विधिमंडळामध्ये स्वतंत्र गट स्थापन करण्याचा हेतूच अडचणीत आला आहे. 36चा गट नसल्याने बाकीचे सर्व शिंदे गटातील आमदार पक्षविरोधी भूमिका घेतल्याच्या कारणामुळे अपात्र होऊ शकतात.

याच शक्यतांवर काल शरद पवारांनी बंडखोर आमदारांना किंमत मोजावी लागेल, असा इशारा दिला होता. तथापि, हे राजकीय डावपेच एकनाथ शिंदे कसे हाणून पाडतात हे पाहणे रंजक असेल.

एकनाथ शिंदेंचे अपात्रतेच्या खेळी प्रत्युत्तर

शिवसेनेने शिंदे गटाच्या 12 आमदारावर कारवाई करण्यासाठी विधानसभा उपाध्यक्षांना पत्र दिल्यानंतर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आक्रमक झाले आहेत. त्यांनी प्रखर ट्विट करीत ”कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय? तुमची बनवाबनवी आणि कायदा आम्हालाही कळतो! त्यामुळे असल्या धमक्यांना भीक घालत नाही. तुम्ही संख्या नसताना अवैध गट तयार केला म्हणून तुमच्यावरच कारवाईची आमची मागणी आहे असा पलटवार केला आहे.

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासह बारा आमदारांना पक्षाच्या विधिमंडळ बैठकीला हजर राहीले, त्यांना आधीच नोटीस दिली होती; पण त्यानंतरही ते बैठकीला गैरहजर राहीले. त्यामुळे आम्ही विधानसभा उपाध्यक्ष झिरवळ यांना त्यांचे सदस्यत्व कायदेशिररित्या रद्द व्हावे यासाठी याचिका शिवसेनेच्या शिष्टमंडळाने दिली. त्यावर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेने विधानसभा उपाध्यक्षांकडे केलेली मागणी बेकायदेशिर असल्याचे म्हटले आहे यासह त्यांनी तीन आक्रमक ट्विट केले आहेत. या ट्विटमध्ये त्यांनी ठाकरे सरकारला उद्देशून आपण घाबरत नसल्याचे म्हटले आहे.

शिंदे म्हणाले, ”कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय? तुमची बनवाबनवी आणि कायदा आम्हालाही कळतो! घटनेच्या 10 व्या परिशिष्टाप्रमाणे (शेड्युल) व्हीप हा विधानसभा कामकाजासाठी लागतो, बैठकीसाठी नाही. यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचे असंख्य निकाल आहेत.

The Focus Explainer The picture of independence will be clear by Sunday, what is Pawar’s new move Read more

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”