“शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठींबा नाकारावा, नाहीतर शिवसेनेचे २०२४ मध्ये खूप मोठे नुकसान होईल”,रामदास आठवलेंना इशारा 


विशेष प्रतिनिधी

अमरावती:‍ बर्‍याच दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण अनेकविध मुद्द्यांमुळे तापलेले पाहायला मिळत आहे. यामध्ये मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, कोरोनाची परिस्थिती आणि निर्बंध, महागाई यांवरून सत्ताधारी ठाकरे सरकार आणि विरोधी पक्ष भाजप या दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत.Shivsena should deny the support of Congress and NCP, otherwise the Shiv Sena will be very damaged in 2024 “, Ramdas Hints

दरम्यान आता रिपाइंचे सर्वेसर्वा आणि केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी एक भविष्यवाणी सांगितली असून, शिवसेनेला २०२४ मध्ये खूप मोठे नुकसान होईल, असे म्हटले आहे. शिवसेनेने भाजपसोबत युती करुन सरकार स्थापन करावे, अजूनही वेळ गेली नाही, अशी इच्छा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली.



रामदास आठवले यांनी शिवसेनेचे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काय होणार, यावर भाष्य केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.
महाविकास आघडीच्या सरकारमध्ये सातत्याने भांडण असतात. त्यामुळे हे सरकार कीती वर्ष टीकेल हे काही सांगता येत नाही. यांना एकत्र राहायचं असेल तर यांनी एकमेकांच्या चुका दर्शवण्याच थांबवल पाहिजे.

पुढे आठवले म्हणाले की , शिवसेनेला जर  बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न साकारायचे असेल आणि आपले मतदार जपायचे असतील तर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठींबा नाकारावा, तेव्हाच शिवसेना टिकेल. नाहीतर शिवसेनेचे २०२४ मध्ये खूप मोठे नुकसान होईल, असे भाकित रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.

तसेच आठवले म्हटले की  राज्यसभेत घडलेला प्रकार संसदेच्या इतिहासातील कलंकित घटना आहे. अधिवेशनादरम्यान सरकारने सभागृहात अनेकदा चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, विरोधकांनी सातत्याने गोंधळ घालून कामकाज बंद पाडले.दरम्यान राहुल गांधी चुकीच्या पद्धतीने वागले आहेत, असे दावा करत यासाठी त्यांना वर्षभरासाठी सभागृहातून निलंबित केले पाहिजे, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली.

राहुल गांधी दरवेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपवर संविधानाची पायमल्ली करत असल्याचा आरोप करतात. राहुल गांधी यांच्या वक्तव्यांमुळेच काँग्रेस पक्षाची दुर्दशा झाली आहे, असा टोलाही रामदास आठवले यांनी लगावला आहे.

Shivsena should deny the support of Congress and NCP, otherwise the Shiv Sena will be very damaged in 2024 “, Ramdas Hints

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात