शाळकरी मुलीवर अत्याचार; आरोपी अटकेत न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी


शाळेत शिरून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून पसार झालेल्या आरोपीला गुन्हे शाखेने पकडले आहे.त्याला 30 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. Shivajinagar school ११yrs girl raped case accused get police custody


विशेष प्रतिनिधी

पुणे – शाळेत शिरून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून पसार झालेल्या आरोपीला गुन्हे शाखेने पकडले. शाळेच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमेरे तसेच मुलीने दिलेल्या वर्णनाआधारे आरोपीचा माग काढण्यात आला. मंगेश तुकाराम पदमुले (वय 36, रा. पांडवनगर, मूळ रा. आजगणी, जि. रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. Shivajinagar school ११yrs girl raped case accused get police custody

शिवाजीनगर भागातील एका शाळेत शिरून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस आधिकाऱ्यांनी भेट देऊन आरोपीचा माग काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. शाळेच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तसेच मुलीने दिलेल्या वर्णनानुसार गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने आरोपीचा माग काढण्यास सुरूवात केली होती.

आरोपी पदमुले वडारवाडी भागात थांबल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला सापळा लावून पकडले. पदमुले काही कामधंदे करत नाही. तो रखवालदार म्हणून नोकरीच्या शोधात होता. अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शैलेश संखे, उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी, अमोल पवार, अजय थोरात, महेश बामगुडे, तुषार माळवदकर, शशीकांत दरेकर, राहुल मखरे, अय्याज दड्डीकर, अशोक माने, विजयसिंग वसावे, इम्रान शेख, सतीश भालेकर, मीना पिंजण आदींन ही कामगिरी केली. दरम्यान त्याला न्यायालयात हजर केले.

त्यावेळी तो पीडित मुलीच्या ओळखीचा आहे. वैद्यकीय तपासणी करणे, तसेच गुन्हा करताना परिधान केलेले कपडे जप्त करण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी विशेष सरकारी वकील शुभांगी देशमुख यांनी केली. त्यानुसार त्याला 30 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

Shivajinagar school ११yrs girl raped case accused get police custody

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात