Pegasus Phone Tapping Controversy : पॅगासिस नावाच्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून परदेशातील कंपन्या तसेच अॅपच्या माध्यमातून जगभरातील काही पत्रकार आणि राजकारण्यांचे फोन टॅप झाल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. यावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केला आहे. फोन टॅपिंग हा देशाच्या स्वातंत्र्याला धोका असून पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी त्यावर स्वत: खुलासा करावा, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. या मुद्द्यावर संसदेत आवाज उठवणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. Shiv Sena MP Sanjay Raut Reaction On Pegasus Phone Tapping Controversy
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पॅगासिस नावाच्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून परदेशातील कंपन्या तसेच अॅपच्या माध्यमातून जगभरातील काही पत्रकार आणि राजकारण्यांचे फोन टॅप झाल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. यावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केला आहे. फोन टॅपिंग हा देशाच्या स्वातंत्र्याला धोका असून पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी त्यावर स्वत: खुलासा करावा, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. या मुद्द्यावर संसदेत आवाज उठवणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
मोदी सरकारमधील काही मंत्री, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, न्यायाधीश आणि काही पत्रकारांचे फोन टॅप केले जात आहेत. यात मोठमोठ्या वृत्त समुहांच्या 40 हून अधिक पत्रकारांचे अज्ञात एजन्सीकडून फोन टॅप केल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. यासाठी पिगासस स्पायवेअरचा वापर करण्यात येत आहे, हे पत्रकार हिंदुस्थान टाईम्सचे कार्यकारी संपादक शिशीर गुप्ता यांच्यासह इंडिया टुडे, नेटवर्क 18, द हिंदू आणि इंडियन एक्स्प्रेस सारख्या बड्या वृत्त समुहांमधील आहेत. फोन टॅपिंग प्रकरणी वॉशिंग्टन पोस्ट अहवाल जाहीर करणार असल्याचा आरोप माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केले आहे. पिगासस प्रोजेक्टवर लक्ष ठेवणाऱ्या तज्ज्ञांना आढळले की, या यादीतील 10 भारतीयांचे फोन नंबरवर एकतर पिगाससकडून हॅक करण्याचा प्रयत्न झाला किंवा हॅकिंग यशस्वी झाले आहे. पिगासस हे इस्त्रायली कंपनीने बनविलेले एक हॅकिंगचे हत्यार आहे. याचा वापर फक्त सरकारी कामांसाठी म्हणजेच दहशवादी कारवायांचा शोध घेण्यासाठी केला जातो. कंपनीने त्यांच्या भारतीय ग्राहकांची यादी जाहीर करण्यास नकार दिला. ज्या लोकांना लक्ष्य करण्यात आले आहे किंवा करण्यात आले त्यांची नावे देखील जाहीर करण्यास कंपनीने नकार दिला आहे. तसेच ज्या एजन्सीने भारतीय नंबरवर लक्ष ठेवले ती अधिकृत भारतीय एजन्सी असल्याचे या कंपनीने स्पष्ट केले आहे.
यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. फोन टॅपिंग झाल्याची काही नावे समोर आली असून आणखी बरीचशी नावं समोर यायची आहे. पत्रकारांचे सर्वाधिक फोन टॅप झाले. संपादकांचेही फोन टॅप झाले. हे गंभीर आहे. गेल्या काही वर्षापासून पत्रकार, राजकारणी या देशात भीतीच्या सावटाखाली वावरत आहेत. आपल्यावर पाळत ठेवली जाते, आपले फोन टॅप केले जातात. ही सगळ्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. त्यावर पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्र्यांनी समोर येऊन खुलासा करणं गरजेचं आहे. काही परदेशी कंपन्या, परदेशी अॅप अशा प्रकारे या देशाच्या प्रमुख लोकांचे फोन ऐकत असतील तर या देशातील स्वातंत्र्याला सर्वात मोठा धोका आहे, असंही संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत म्हणाले की, या देशाचं शासन आणि प्रशासन कमकुवत आणि दुबळं असल्याचं हे लक्षण आहे. कोणीही ऐरागैरा येतो आणि आमचे फोन टॅप करतो. आमच्याकडे सायबर क्राइम संदर्भात कठोर नियम नाहीत, कायदे नाहीत. सरकारने ज्या पद्धतीने समोर येऊन या सर्व गोष्टींचा मुकाबला करायला हवा. ते दिसत नाही. त्यामुळे देशात सर्वच क्षेत्रात भीतीचं वातावरण आहे. याबाबत काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी माझं बोलणं झालं आहे. आम्ही हा प्रश्न संसदेत लावून धरणार आहोत. महाराष्ट्रात सरकार बनत असताना त्याआधी फोन टॅपिंग करण्यात आली होती. फोन टॅप करणारे आमचेच म्हणजे महाराष्ट्रातील होते. त्याची चौकशी सुरू आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी हे प्रकरण विधानसभेत मांडलं. त्यावर चौकशी लावली. महाराष्ट्रातील वरिष्ठ अधिकारी या फोन टॅपिंगमध्ये होते. त्याची चौकशी सुरू आहे, असं सांगतानाच उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे फोन टॅप कोणी करत असेल तर आश्चर्य वाटणार नाही, असंही संजय राऊत म्हणाले.
Shiv Sena MP Sanjay Raut Reaction On Pegasus Phone Tapping Controversy
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App