कावड यात्रेपासून हिंदूंच्या सगळ्या धार्मिक कार्यक्रमांवर बंदी मात्र केरळमध्ये बकरी ईदसाठी निर्बंध कमी, आयएमएचा न्यायालयात जाण्याचा इशारा, भाजप, कॉँग्रेसनेही फटकारले

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोना महामारीमुळे देशातील उत्तर प्रदेश, उत्तराखंडसारख्या अनेक राज्यांत कावड यात्रेपासून हिंदूंच्या सगळ्या धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, देशातील सर्वाधिक साक्षर म्हणविल्या जाणाऱ्या केरळमध्ये मात्र बकरी ईदसाठी निर्बंध कमी केले आहेत. पुन्हा निर्बंध लावले नाहीत तर सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा भारताची सर्वोच्च डॉक्टर संघटना असलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए)दिला आहे.Ban on all Hindu religious programs, but restrictions realesed for Bakri Id in Kerala, IMA warns to go to court, BJP, Congress also slammed

आयएमएने म्हटले आहे की, केरळ सरकारचा हा निर्णय दुर्दैवी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिर्थक्षेत्रे आणि पर्यटनस्थळांवर होत असलेल्या गर्दीबाबत इशारा दिला आहे. त्यामुळे अनेक राज्यांनी तिर्थयात्रा रद्द केल्या आहेत. जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश आणि उत्तरांचल यासारख्या अनेक उत्तरेकडील असलेल्या अनेक राज्यांनी जनक्षोभाची पर्वा न करता धार्मिक स्थळांच्या ठिकाणी निर्बंध लादले आहेत. मात्र, पुरोगामी म्हणविल्या जाणाऱ्या केरळ राज्याने मात्र प्रतिगामी निर्णय घेतला आहे.केरळ सरकारने जाहीर केले आहे की राज्यात बुधवारी साजरा होणाºया बकरी ईदसाठी रविवारपासून लॉकडाऊनमधील निर्बंध कमी करण्यात आले आहेत. कपडे, पादत्राणे, दागदागिने, गिफ्ट आयटम, घरगुती उपकरणे आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि दुरुस्तीची दुकाने विक्री करणारी दुकाने उघडण्यास परवानगी दिली जाईल.

बकरी ईदबरोबरच चित्रपटाच्या शूटिंग आणि प्रार्थनास्थळांना परवानगी देण्याची घोषणा मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी केली आहे. विजयन म्हणाले, लॉकडाउन लावणे गरजेचे असले तरी तरी प्रचंड आर्थिक आणि सामाजिक समस्या उद्भवत आहेत. म्हणूनच दररोज कोरोना संसर्गाचे मूल्यांकन केल्यावर काही सवलतींना परवानगी देण्यात आली आहे.

केरळ सरकारच्या या निर्णयावर डाव्या आघाडीच्या सरकारला कॉँग्रेसनेही फटकारले आहे. कॉंग्रेसचे नेते अभिषेक सिंघवी म्हणाले, केरळ हा कोरोनाचा हॉटस्पॉट आहे. कावड यात्रा चुकीची असेल तर बकरा ईद सार्वजनिक स्तरावर साजरी करणेही चुकीचे आहे. उत्सव देखील असे आहेत,” असे कॉंग्रेस नेते अभिषेक सिंघवी यांनी सांगितले.

ट्विट भाजपाचे केंद्रीय मंत्री व्ही मुरलीधरन यांनी आरोप केला आहे की केरळमधील विजयन यांचे सरकार कोरोना उपाययोजना आणि लॉकडाऊन लावण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन पाळत नाही. केरळने भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण करावे. राजकीय फायदा होण्याकरिता कोरोना महामारीचा उपयोग करू नका.

Ban on all Hindu religious programs, but restrictions realesed for Bakri Id in Kerala, IMA warns to go to court, BJP, Congress also slammed

महत्त्वाच्या बातम्या