पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पुन्हा बरळले, म्हणाले भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा भारतासाठी धोकादायक

विशेष प्रतिनिधी

इस्लामाबाद : भारताच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करत पाकिस्तानचे अध्यक्ष इम्रान खान पुन्हा बरळले आहे. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा भारतासाठी धोकादायक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हे दोघे केवळ मुस्लिमांनाच लक्ष्य करत आहेPakistan’s PM Imran Khan says BJP and RSS ideology dangerous for India

असे नव्हे तर शिख, ख्रिश्चन आणि अनुसुचित जातींनाही टारगेट करत असल्यचे त्यांनी म्हटले काश्मीर प्रश्नावर आपण सर्व आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर ब्रॅँड अ‍ॅँबेसेटर म्हणून काम करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

पाकव्याप्त काश्मीर भागातील निवडणूक प्रचारादरम्यान आपणच काश्मीर प्रश्नावरचे आंतरराष्ट्रीय ब्रँड अ‍ॅँबेसेटर असल्याचे सांगून इम्रान खान म्हणाले, भारतानं एका सभ्य शेजाºयाप्रमाणे वर्तन करावं, अशी अपेक्षा आम्ही कित्येक दिवसांपासून करत आहोत. मात्र संघाचे तत्त्वज्ञान त्याच्या आड येत आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपची विचारधारा भारतासाठी धोकादायक असल्याचं इम्रान खान यांनी म्हटलं आहे. शनिवारी पाकव्याप्त काश्मीर परिसरात प्रचार करत असताना संघाचा किती धसका इम्रान खान यांनी घेतला आहे, याची प्रचिती आली.

भाजप आणि संघाची विचारधारा ही केवळ मुस्लिमांनाच नव्हे, तर शीख आणि ईसाई नागरिकांनादेखील हिन दजार्ची वागणूक देत असल्याचं ते म्हणाले. इतर धर्मियांना संघाचे लोक बरोबरीची वागणूक देत नाहीत.

इम्रान खान म्हणाले, जम्मू-काश्मीरमधून भारत सरकारनं कलम 370 हटवल्यानंतर राज्यातील परिस्थिती चिघळली असून काश्मीरमधील कायदा आणि सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. 5 ऑगस्ट 2019 पासून काश्मीरची स्थिती बिघडली असून या प्रश्नाचे आपणच आंतरराष्ट्रीय ब्रँड अ‍ॅँबेसेटर आहोत. भारतानं कलम 370 पुन्हा प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू केल्याशिवाय आपण भारताशी चर्चा करणार नाही.

जर काश्मीरमधील जुनी परिस्थिती बहाल करण्यासाठी भारताने रोडमॅप बनवला तर आम्ही त्यांच्यासोबत चर्चेसाठी तयार आहोत. भारताने पाकिस्तानला सांगावे की, काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा निर्णय परत घेण्यासाठी पाऊले उचलावीत. काश्मीरचे स्पेशल स्टेटस संपवणे इंटरनॅशनल लॉ आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या नियमांचे उल्लंघन आहे.

Pakistan’s PM Imran Khan says BJP and RSS ideology dangerous for India

महत्त्वाच्या बातम्या