शेतकऱ्यांच्या मागण्या संदर्भात लाँग मार्च मुंबईत धडकण्याआधीच सकारात्मक निर्णय


प्रतिनिधी

मुंबई :  कम्युनिस्ट किसान संघ प्रणित शेतकऱ्यांचा लाँग मार्च मुंबई पोहोचण्याआधीच शिंदे – फडणवीस सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यावर सकारात्मक निर्णय घेतला आहे. Shinde Fadanavis government took positive decisions regarding farmers long march from nashik

शेतकऱ्यांचा मुंबईत येणारा मोर्चा शमण्याच्या मार्गावर आहे, कारण राज्य सरकार आणि शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींमध्ये सकारात्मक चर्चा झाली आहे. किसान सभा शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्यात दोन तास बैठक झाली, या बैठकीत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत.

पण सरकारशी सकारात्मक चर्चा झाली असली तरी मोर्चा लागलीच मागे घेणार नाही, असे कम्युनिस्टांच्या किसान सभेने कडून स्पष्ट केले आहे. दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी सुरू होत नाही, तोपर्यंत मोर्चा वाशिंदमध्येच थांबणार आहे. या लाँग मार्चला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.

उद्या विधिमंडळाच्या पटलावर मागणीचे विषय घेऊन संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना घेतलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीचे आदेश पारित झाल्यानंतर मोर्चा मागे घेतला जाईल, असा पवित्रा किसान सभेच्या नेत्यांनी घेतला आहे. शिष्टमंडळासोबत गेलेल्या नेत्यांनी न्यूज 18 लोकमतला ही माहिती दिली आहे. मोर्चा आज मागे घेणार नाही, मात्र उद्या आदेश निर्गमित झाल्यानंतर मोर्चा मागे घेतला जाईल, असं किसान सभेकडून सांगण्यात आलं आहे.

शेतकरी मोर्चा पुढे काय होणार?

  • आजच्या बैठकीत झालेल्या चर्चेचे, निर्णयाचे minutes उद्या सभागृहात मांडण्यात येणार, त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात येणार
  • उद्या सभागृहात मुख्यमंत्री निवेदन केल्यानंतर शेतकरी लाँग मार्च थांबणार
  • वनजमीनीच्या प्रश्नांबाबत जिल्हा पातळीवर समिती नेमणार
  • त्यात सरकार आणि शेतकरी प्रतिनिधी असणार

शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी दिंडोरीहून शेतकऱ्यांच्या लाँग मार्चला सुरूवात झाली. पायी निघालेले शेतकरी मुंबईच्या दिशेने येत होते. त्याआधी बुधवारी राज्य सरकारचं एक शिष्टमंडळ शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना जाऊन भेटले. यामध्ये मंत्री दादा भुसे, अतुल सावे आणि अभिमन्यू पवार यांचा समावेश होता, पण यात कोणताही तोडगा निघाला नाही. अखेर आज मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये मंत्रालयात आणखी एक बैठक पार पडली, त्यामध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा निघाला.

Shinde Fadanavis government took positive decisions regarding farmers long march from nashik

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात