बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा हे गेल्या अनेक दिवसांपासून वादग्रस्त पॉर्न प्रकरणामुळे चर्चेत भाग आहेत. अश्लील चित्रपट बनवल्याबद्दल राज कुंद्राला अटक करण्यात आली. कुंद्रा सध्या जामिनावर बाहेर आहे. राज कुंद्राच्या अटकेपासून ते आतापर्यंत शर्लिन चोप्राने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आता तिने शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे. Sherlyn chopra lodges FIR against raj kundra and shilpa shetty
विेशेष प्रतिनिधी
मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा हे गेल्या अनेक दिवसांपासून वादग्रस्त पॉर्न प्रकरणामुळे चर्चेत भाग आहेत. अश्लील चित्रपट बनवल्याबद्दल राज कुंद्राला अटक करण्यात आली. कुंद्रा सध्या जामिनावर बाहेर आहे. राज कुंद्राच्या अटकेपासून ते आतापर्यंत शर्लिन चोप्राने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आता तिने शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे.
शर्लिनने राज आणि शिल्पावर फसवणूक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. शर्लिन चोप्राला राज कुंद्रा प्रकरणादरम्यान अनेक आरोपांना सामोरे जावे लागले आहे. तिलाही चौकशीसाठी बोलावले होते. याबद्दल तिने सोशल मीडियावर आपले म्हणणे मांडलेले आहे.
शर्लिन चोप्रा हिने 14 ऑक्टोबर रोजी राज आणि शिल्पाविरोधात एफआयआर दाखल केली होती, तिने याबाबत माध्यमांशीही संवाद साधला. ती म्हणाली की, मी राज कुंद्राविरोधात लैंगिक छळ, फसवणूक आणि धमकी दिल्याबद्दल तक्रार दाखल केली आहे.
पत्रकार परिषदेत शर्लिन चोप्रा म्हणाली की तिने मला अंडरवर्ल्डची धमकी दिली. तिने शिल्पा व राजवर आरोप करताना म्हटले की, “तुम्ही खूप चांगले लक्षात ठेवले पाहिजे की तुम्ही माझा लैंगिक छळ केला आहे, तुम्ही मुलींना त्यांचे शरीर दाखवून दाखवायला लावता, मग त्यांचे पैसे का देत नाही? तुम्ही त्यांना फसवता. कलाकारांच्या घरी जाऊन त्यांना अंडरवर्ल्डची धमकी देता. ते म्हणताहेत की, लैंगिक शोषणाची केस मागे घ्या अन्यथा तुमचे आयुष्य उद्ध्वस्त होईल.”
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App