विशेष प्रतिनिधी
मुंबई – सहा वर्षांपासून सुरू असलेल्या शीना बोरा हत्या प्रकरणाचा तपास थांबवण्याचा निर्णय सीबीआयने घेतला आहे. याबाबतचा क्लोजर रिपोर्ट सीबीआयने विशेष न्यायालयात दाखल केला आहे. सन २०१५ मध्ये शीना बोरा हत्याकांड उघड झाले होते. शीना ही या प्रकरणातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जीची मुलगी होती.Sheena Bora case will be closed by CBI
मालमत्तेच्या वादातून इंद्राणीने एप्रिल २०१२ मध्ये आधीचा नवरा संजीव खन्ना आणि वाहनचालक शामवर रायच्या मदतीने शीनाची हत्या केली होती. तिचा मृतदेह पेणजवळील दरीत फेकून दिला होता. घटनेनंतर तब्बल तीन वर्षांनंतर हा गुन्हा उघडकीस आला होता.
राय याला अन्य एका प्रकरणात मुंबई पोलिसांनी अटक केली होती. त्या वेळी शीना बोरा हत्याकांड उघड झाले होते. त्यानंतर इंद्राणी आणि खन्नाला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणाचा तपास सीबीआयने घेतल्यावर इंद्राणीचा तिसरा नवरा आणि उद्योगपती पीटर मुखर्जीला अटक करण्यात आली होती.
सीबीआयने या प्रकरणात तीन आरोपपत्र आणि दोन पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहेत. रायला या खटल्यात माफीचा साक्षीदार करण्यात आले होते. पीटरचा मुलगा राहुल आणि शीनामध्ये असलेल्या प्रेमसंबंधांमुळेही इंद्राणी नाराज होती असे सीबीआयने म्हटले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App