भाजपानी हे कॉन्ट्रॅक्ट कधी घेतलं? : शरद पवार, पवारांनी साधला केंद्र सरकारच्या धोरणांवर निशाना

विशेष प्रतिनिधी

मुंबई: महाविकास आघाडीच्या नेत्यांवर चालू असणाऱ्या सततच्या तपास यंत्रणेच्या धोरणावर शरद पवार म्हणाले की, केंद्र सरकारकडून तपास यंत्रणांचा गैरवापर होत आहे. आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारकडून तपास यंत्रणांचा गैरवापर होत आहे अशी टीका केली. अनिल देशमुख यांच्यावर आरोप करून परमवीर सिंग मात्र कुठे आहेत ते कळत नाही असे पवार म्हणाले.

Sharad Pawar targets Central Government on misuse of agencies

ते पुढे म्हणाले की, केंद्र सरकार काही संस्थांचा सातत्याने गैरवापर करण्याचे काम करीत आहे. ईडी, सीबीआय, आयकर विभाग व एनसीबी यांचा वापर राजकीय हेतूने केला जात आहे. तेव्हाच्या मुंबई पोलीस आयुक्तांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले होते. या आरोपांमुळे अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला. परंतु ज्यांनी आरोप केले ते मंत्री कुठे आहेत याचा पत्ता लागत नाही. एखाद्या जबाबदार मंत्र्याबाबत जबाबदार अधिकारी आरोप करतो असे कधी घडले नव्हते. ज्यांनी आरोप केले ते पुढे येत नाहीत. पण अनिल देशमुख मात्र सत्ते पासून बाजूला झाले हा फरक आहे.

अनिल देशमुख यांच्या बाबतीत चौकशीचे काम अजून चालूच आहे. काल त्यांच्या घरी परत छापा घातला गेला. हा छापा पाचव्यांदा केला असून या एजन्सीने पुन्हा पुन्हा तिथे जाऊन काय मिळवले हे माहीत नाही. या एजन्सीने हा विक्रमच केला आहे हे मान्य केले पाहिजे. एखाद्या ठिकाणी पाच वेळा जाणे कितपत योग्य आहे याविषयी विचार करण्याची वेळ आली आहे. यावर जनमत व्यक्त करण्याची गरज आहे. असे सूचक वक्तव्य पवार यांनी केले आहे.

राष्ट्रवादीसह तीन सत्ताधारी पक्षांना टारगेट केले जात आहे. सदर पक्षातील लोकांवर लक्ष केंद्रित केले आहे. दिल्लीच्या सत्ताधारी पक्षाने राज्यात सरकार बनवण्याचा प्रयत्न तीन वर्षे केला. तर आता काही होऊ शकत नाही म्हणून हा असा मार्ग स्वीकारला आहे. शासनात असलेल्या लोकांच्या जवळच्या संबंधितांना भीती दाखवण्याचे धोरण अवलंबले आहे. अशा गोष्टी घडल्या असल्या तरी त्याबद्दल चिंता करण्याचे कारण नाही असे ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, लखमिपुर येथे शेतकऱ्यांच्या जमावावर काही लोक गाडीतून येऊन धक्के देतात व त्यात शेतकरी व इतर लोकांची हत्या होते. त्यात एक पत्रकार देखील होते. अशी घटना कधी घडली नव्हती. केंद्रीय गृहराज्यमंत्री यांचे पुत्र त्या गाडीत होते. असे शेतकऱ्यांनी सांगूनदेखील ते नाकारले गेले. कारवाई करण्याच्या मागणीला उत्तर प्रदेश सरकारने किंवा केंद्र सरकारने प्रतिसाद दिला नाही. परंतु आता त्यांना उत्तर प्रदेश सरकारला अटक करावी लागली यावरून आवश्यक असलेला पुरावा त्यांच्या हाती लागला असावा हे स्पष्ट आहे.

त्यांनी याबाबत भूमिका घेतली नाही परंतु गृह खात्याची जबाबदारी असलेल्या मंत्र्यांना हे टाळता येणार नाही. त्यांनी आपल्या पदावरून दूर झाले पाहिजे. तसे झाले तर लोकांचा कायदा-सुव्यवस्था व शासन याबाबत विश्वास निर्माण होईल.

लखमिपुरचा प्रश्न निर्माण झाल्यावर माजी मुख्यमंत्री पवार पुढे म्हणाले की, मावळ मध्ये काय घडले होते? परंतु मावळमध्ये शेतकरी मृत्युमुखी पडले त्याला जबाबदार कोणी सरकारी नेते नव्हते. तो आरोप पोलिसांवर होता व त्या घटनेला आता बराच काळ होऊन गेलेला आहे. त्या वेळी सत्ताधारी पक्षाबाबत लोक नाराज झाले. आता असे लक्षात आले आहे की ज्यांच्यावर आपण आरोप केले त्यांच्याशी संबंध नव्हता. याउलट स्थानिक भाजपच्या लोकांनी ही परिस्थिती हातावर जावी म्हणून लोकांना प्रोत्साहित केले होते आणि त्यामुळे संघर्ष झाला म्हणूनच आता मावळमधील चित्र बदलले आहे.

काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या काळातला मावळ गोळीबार होण्यास कोण कारणीभूत होते हे लक्षात आल्यानंतर आताच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शेळके निवडून आले. माजी मुख्यमंत्री यांनी मावळचे उदाहरण दिले ते बरे झाले. जर मावळ मधली परिस्थिती त्यांनी समजून घेतली तर त्यांचे ज्ञान थोडे वाढेल. काही लोकांना आणि पक्षांना बदनाम केले जात आहे. आम्ही नेहमीच प्रशासनाशी संबंध चांगले ठेवले आहेत. नबाब मलिक यांनी एका व्यक्तीविषयी आपले विचार मांडले. मी याबाबत माहिती घेतली. समीर वानखेडे एक्साईज विभागात होते तिथे काही कथा त्यांच्याबद्दल मला ऐकायला मिळाल्या पण त्याविषयी पूर्ण माहिती नसल्यामुळे मी भाष्य करत नाही.

या प्रकरणात एनसीबी व मुंबई पोलीस अशा दोन एजन्सी आहेत. केंद्राच्या एजन्सीने गेल्या काही वर्षात जी रिकवरी केली त्याचे प्रमाण अतिशय कमी आहे. मुंबई पोलिसांनी केलेल्या जप्तीचे प्रमाण खूप जास्त आहे. राज्याची एजन्सी चांगले काम करते आणि केंद्राची एजन्सी मात्र सरकारला देण्यासाठी रेकॉर्ड करावे लागते म्हणून काम करते असे वाटते.


लखीमपूर खेरीची घटना म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.


गुन्हा घडल्यानंतर पोलिस किंवा यंत्रणा आधी पंचनामा करतात. ही कारवाई योग्य आहे असे वाटावे असेच पंच नेमले पाहिजेत. जे कोणी पंच होते ते गेले काही दिवस कुठे आहेत माहिती नाही. पंच म्हणून निवड केलेली व्यक्ती समोर येत नसेल तर ते नक्कीच संशयास्पद आहे. नारकोटिक्स च्या अधिकाऱ्यांनी अशी निवड केली त्यांचे संबंध कोणत्या प्रकारच्या लोकांशी आहेत हे पण यावरून कळत आहे. आरोपानंतर खुलासासाठी पण सगळ्यात आधी भाजपाचे नेते होते. मला कळेना की हे कॉन्ट्रॅक्ट भाजपच्या नेत्यांनी कधी घेतले. एका ठिकाणी छापे टाकले त्याबाबत एक केंद्रीय मंत्री हे आमचं काम आहे असे बोलले. मला हे माहिती नव्हतं मी सरकारमध्ये काम केले आहे पण हे आमचं काम असतं असे म्हणून आमच्या ज्ञानात भर टाकली आहे. ते मला भेटल्यानंतर मी त्यांचे जाहीर आभार मानणार आहे. शासकीय यंत्रणेकडून सत्तेचा गैरवापर होत आहे हा खरा मुद्दा आहे तर त्याचे समर्थन करताना भाजपाचे लोक दिसत आहेत.

लखमिपुर प्रश्नावरून महाराष्ट्रामध्ये तीन प्रमुख पक्षांनी बंद करण्याचा निर्णय घेतला व तो यशस्वी झाला यासाठी सगळ्या जनतेचे व तीनही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे आभार मानायला हवेत. लखमिपुर मध्ये शेतकऱ्यांची हत्या झाली याची नोंद राज्यातील सामान्य माणूस घेतोय हेच यावरून दिसते.

राज्यात आता साखर कारखाने सुरू होतील. यंदा ऊस उत्पादन पाऊस चांगला असल्यामुळे भरपूर झाले आहे. धरणे भरली आहेत व पुढील वर्षी उसाची लागवड अजून जास्त होणार आहे यामुळे ऊसाच्या उत्पादनाचे पुढील वर्षांत रेकॉर्ड ब्रेक होऊ शकेल. मुंबई हे वस्त्रोद्योगाचे देशातील केंद्र होतं परंतु आता गिरण्या बंद झाल्या. मी त्या वेळेला सगळ्यांना सांगत होतो की तुटेल इतके ताणू नये पण ते ताणलं आणि आज महाराष्ट्रातील कापड धंदा जवळपास संपला आहे. ही अवस्था साखर उद्योगाची होऊ नये अशी माझी अपेक्षा आहे. याबाबत आग्रही असणाऱ्यांनी विचार करावा उत्पादकांना न्याय मिळायला हवा हेच आपले सूत्र आहे पण चर्चेतून मार्ग निघू शकतो.

अजित पवार यांचे स्टेटमेंट मी वाचले आहे. त्यात असे म्हटले आहे की मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे व सरकारचे रिसोर्सेस महत्त्वाचे असतात. रिकवरी करण्यासाठी काही भूमिका घेतली गेली तर माझा त्याला विरोध असणार नाही व अर्थमंत्री म्हणून माझी ती जबाबदारी आहे.

शरद पवार पुढे असे म्हणाले की, वस्तुस्थिती सांगण्यासाठी ही चौकशी थांबल्यानंतर मी बोलेनच. ती चौकशी अजून सुरू आहे. मला मिळालेल्या माहितीनुसार असे पाहुणे अनेक ठिकाणी येतात दोन-तीन दिवस असतात पण आजचा सहावा दिवस आहे. अजीर्ण होणे इतका पाहुणचार त्यांनी घेऊ नये. कारखाना तीन्ही मुलींचा नाही. एक डॉक्टर, एक पब्लिकेशनमध्ये आहे व एक गृहिणी आहे. ते तिथे गेले चौकशी करायची ती केली त्यांना फोन येत होते की इतक्यात सोडू नका. आमच्या मुलींनी त्यांना विचारले की, तुमचे घरचे वाट बघत असतील तेव्हा ते म्हणाले की आम्हाला आदेश आहेत की विचारल्याशिवाय घर सोडायचे नाही. पाच दिवस झाले तरी अजून पाहुणे तिथेच आहेत. परंतु एखाद्याच्या घरात पाच-सहा दिवस जाऊन चौकशी केल्याचे कधी ऐकले नाही. पण योग्य वेळी त्याबाबत विचार करू. कोल्हापूरला जास्त लोक घरी रहात नव्हते. नवरा-बायको राहत होते. त्यांच्याकडे १८ लोक गेले. असे कधी पाहिले नव्हते. परंतु ते घडत आहे. चांगली गोष्ट आहे. आम्ही सत्तेचा गैरवापर कधी केला नाही व करत नाही.

Sharad Pawar targets Central Government on misuse of agencies

 

महत्त्वाच्या बातम्या