विलीनीकरणाची मागणी मंजूर केली नाही त्यामुळे सध्या एसटी कामगारांचा संप चिघळला असून त्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे.Sharad Pawar says let’s find a middle ground on strike, but where exactly is Pawar’s middle ground? Criticism of Sadabhau Khot
विशेष प्रतिनिधी
मुंबई : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलनीकरण, वेतन आणि इतर मागण्यांसाठी मागील काही दिवसांपासून एसटी कामगारांनी संप पुकारला आहे. 26 ऑक्टोबरपासून म्हणजेच ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केलं.अजूनही संप चालूच आहे.या आंदोलनाला राज्यातील विविध भागातल्या एसटी कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि एसटीचा संप सुरू झाला.अजूनही विलीनीकरणाची मागणी मंजूर केली नाही त्यामुळे सध्या एसटी कामगारांचा संप चिघळला असून त्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे.
ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी महामंडळाने केली तिकीट दरवाढ! आज रात्री पासून एसटी प्रवास महागणार
दरम्यान, हा संप कधी संपणार याकडे सगळ्याचं लक्ष लागून आहे. तसेच राज्य सरकार या संपावर काय निर्णय घेईल हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपच नेतृत्व भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत करत आहेत.यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकार आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
सदाभाऊ खोत म्हणाले की , ” शरद पवार म्हणतात संपावर मध्य मार्ग काढू, पण पवारांचा मध्य मार्ग नेमका कुठे आहे हे कधीच समजल नाही. दरम्यान सत्तेवर येण्यासाठी पवार साहेब पावसात भिजले, पण विचार करण्याची गोष्ट आहे की काल एसटी कर्मचारी पावसात भिजले, तेव्हा त्यांच्या डोळ्यातील अश्रू पवारांना दिसले नाहीत हे राज्याचं दुर्देव असल्याची टीका सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App