ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी महामंडळाने केली तिकीट दरवाढ! आज रात्री पासून एसटी प्रवास महागणार


विशेष प्रतिनिधी

मुबंई : 2018 नंतर तब्बल तीन वर्षांनी एसटी महामंडळाने तिकीट दरवाढ केली आहे. कोरोना महामारीमुळे एस टी महामंडळ प्रचंड तोट्यात गेले आहे. तसेच वाढते इंधनाचे दर, थकीत सरकारी अनुदाने, कर्मचाऱ्यांबरोबरच वेतनकरार, कोरोनामुळे प्रवासी वाहतुकीवर असलेले निर्बंध, टाळेबंदी, प्रवाशांची घटलेली संख्या अशा विविध कारणांमुळे एसटी महामंडळ सध्या प्रचंड तोट्यांमधून जात आहे.

ST Corporation raises ticket prices! ST travel will be expensive from tonight

हा तोटा 7000 कोटींच्या घरात आहे. उत्पन्नवाढीसाठी निरनिराळे प्रयत्न केले जात असले तरी ते अपुरे पडत आहेत. यामुळे एसटी महामंडळाने नाइलाजाने दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर तिकिटाच्या दरात 17.5 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे एसटीचा प्रवास किमान पाच रुपयांनी तरी महागणार आहे.


एसटी महामंडळाकडे डिझेलसाठी पैसेच नाहीत, कर्मचाऱ्यांना सक्तीच्या सुटीची सूचना


पहिल्या सहा किलोमीटरच्या प्रवासासाठी दरवाढ करण्यात आली नसली तरी त्यानंतरच्या एसटीच्या प्रत्येक टप्प्याला ही दरवाढ लागू असणार आहे. लांब पल्ल्याचा प्रवास हा महागणार असून दोन प्रमुख शहरांमधील प्रवासासाठी 50 ते 100 रुपये जास्त द्यावे लागणार आहेत. राज्यातील काही प्रमुख शहरातील एसटी प्रवासाचे दर पुढीलप्रमाणे आहेत.

एसटीच्या रात्रीच्या प्रवासाचे दर काहीसे कमी केले आहेत. त्यामुळे दिवसा आणि रात्री धावणाऱ्या साध्या एसटीच्या प्रवासाचा तिकिटाचा दर हा जवळपास समान असणार आहे.

 

ST Corporation raises ticket prices! ST travel will be expensive from tonight

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात