जागावाटप फॉर्म्युल्याची दोन्हीकडे नुरा कुस्ती; बड्या नेत्यांनी मात्र अद्याप साधली चुप्पी!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका अजून दीड पावणे दोन वर्षे लांब असताना सत्ताधारी शिवसेना-भाजप आणि विरोधी महाविकास आघाडी यांच्यातल्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांनी जागावाटप फॉर्म्युल्याची नुरा कुस्ती सुरू केली आहे, पण त्याच वेळी दोन्हीकडच्या बड्या नेत्यांनी मात्र अद्याप चुप्पी साधली आहे. Seat sharing formula : Shivsena – BJP and MVA top leaders yet not spoken openly

शिवसेना – भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात नव्या राजकीय परिस्थितीत विधानसभेचे जागावाटप कसे होणार?? त्याआधी वेगवेगळ्या महापालिका आणि जिल्हा परिषद मध्ये जागावाटप कसे होणार??, याच्या चर्चा कार्यकर्त्यांमध्ये तर रंगल्या आहेतच, पण दोन्ही बाजूंच्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देऊन त्या चर्चांना फोडणी दिली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या आयटीसील मध्ये केलेल्या भाषणात भाजप 240 जागा लढवेल, असे वक्तव्य करून या चर्चेला तोंड फोडले. पण नंतर भाजपच्याच नेत्यांनी त्या चर्चेला पूर्णविराम दिला. पण यानिमित्ताने शिंदे गटाचे दुसऱ्या फळीतले नेते उचकले. त्यांनी शिंदे गटासाठी भाजपकडे 100 ते 120 जागांची मागणी करत आपले पत्ते खुले केले, तर दुसरीकडे महाविकास आघाडीतली जागा वाटपाची रेटारेटी यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये दिसली.यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांचे आसन मध्यवर्ती मांडले होते हे खरे, पण मागच्या पोस्टरवर राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ चिन्ह मध्यवर्ती ठिकाणी लावले होते, तर शिवसेनेचे मशाल चिन्ह तिसऱ्या नंबर वर ढकलले होते. त्यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाला महाविकास आघाडीतून आता सर्वात कमी जागा लढवायला दिल्या जातील, अशा अटकळी माध्यमांनी बांधल्या. त्यामुळे महाविकास आघाडीतल्या जागावाटप फॉर्म्युला राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबर काँग्रेस दोन नंबर आणि शिवसेना तीन नंबर वर ढकलली गेल्याच्या बातम्या आल्या.

प्रत्यक्षात विधानसभेच्या निवडणुका दीड पावणे दोन वर्षे लांब असताना जागावाटप फॉर्म्युल्याच्या या चर्चा रंगल्या आहेत, त्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये. पण शिवसेना-भाजप आणि महाविकास आघाडी या दोन्ही गोटांमधले बडे नेते अद्याप यावर जाहीररित्या बोललेले नाहीत.
उद्धव ठाकरे, शरद पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे जागा वाटपातले मुख्य मोहरे आहेत. पण या चौघांनीही अद्याप तरी चुप्पी साधणे पसंत केले आहे.

Seat sharing formula : Shivsena – BJP and MVA top leaders yet not spoken openly

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!