सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक ; आ.शिंदे यांना अडचणीत आणल्याचा आंदोलकांचा आरोप

समर्थकांनी असा आरोप केला आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आ.शिंदे यांना अडचणीत आणले आहे. ‘शशिकांत शिंदे यांचा विजय असो’, ‘टायगर अभी जिंदा है’ अशी घोषणाबाजी केली. Satara: Stone pelting at NCP office; Protesters accuse MLA Shinde of causing trouble


विशेष प्रतिनिधी

सातारा : गेल्या महिनाभरापासून जिल्हा बँक निवडणुकीचे धुमशान सुरू होते. राजकीय दृष्ट्या ही निवडणुकी महत्त्वाची मानली जात होती. त्यामुळे या निवडणुकीत साताराच्या आजी-माजी पालकमंत्र्यांचं अस्तित्व पणाला लागले होतं. यावेळी सातारा जिल्हा बँक निवडणुकीत राष्ट्रवादीचे सातारा जिल्ह्याचे माजी अध्यक्ष व माजी पालकमंत्री शशिकांत शिंदे यांचा जावळी सोसायटी मतदारसंघातून एक मताने पराभव झाला.

त्यामुळे आ.शशिकांत शिंदे यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक करत निषेध केला.यावेळी समर्थकांनी असा आरोप केला आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आ.शिंदे यांना अडचणीत आणले आहे. ‘शशिकांत शिंदे यांचा विजय असो’, ‘टायगर अभी जिंदा है’ अशी घोषणाबाजी करत पराभवाचा वचपा योग्य वेळी काढू अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.जावळी सोसायटी मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे आणि भाजपचे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक ज्ञामदेव रांजणे यांच्यात लढत झाली. या मतदारसंघात चुरशीने ४९ पैकी ४९ मतदान झाले होते. त्यामुळे निकालाकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या.मंगळवारी मतमोजणी वेळी पहिला निकाल जावळीचा लागला.यात एक मताने रांजणे विजयी झाले.

Satara: Stone pelting at NCP office; Protesters accuse MLA Shinde of causing trouble