Sanjay Raut ED Action : संजय राऊतांची मुंबईतला फ्लॅट आणि अलिबागमधली जमीन ईडीकडून जप्त!!


वृत्तसंस्था

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या संपत्तीवर ईडीने टाच आणलीय. संजय राऊत यांची अलिबागमधील संपत्ती जप्त करण्यात आली आहे. त्यात अलिबागमधील जमिनीचे आठ तुकडे, दादरमधील एक फ्लॅट जप्त करण्यात आला आहे. पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी ईडीने ही कारवाई केल्याचे समजते. पत्राचाळ घोटाळ्यातील पैसे हे अलिबाग येथील जमीन खरेदीसाठी वापरली म्हणून ही कारवाई केली असून, श्रीधर पाटणकर यांच्यानंतर शिवसेनेच्या मोठ्या नेत्यावर ईडीने ही कारवाई केली आहे.Sanjay Raut ED Action

ईडी स्वतःची खबर खोदत आहे. आज महात्मा गांधी यांची पुन्हा हत्या झाली आहे. आरोप सिद्ध झाले तर मी राजकारण सोडून देईन. असत्यमेव जयते, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी या कारवाईनंतर व्यक्त केली आहे.

Sanjay Raut ED Action

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती