प्रतिनिधी
नवी दिल्ली : नवी दिल्ली काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांचे दिवंगत राजकीय सल्लागार अहमद पटेल यांचा मुलगा फैजल पटेल काँग्रेस हायकमांडच्या दुर्लक्षाकडे वैतागला आहे. आपल्याला कोणतेच काम दिले जात नसल्याबद्दल त्याने ट्विट करून नाराजी व्यक्त केली आहे. तसेच आपले सर्व ऑप्शन खुले असून असल्याने पुढची राजकीय वाटचाल आम आदमी पार्टीच्या दिशेने सुरू केल्याचे सूचित केले आहे. Ahmed Patel’s son Faizal angry at Congress High Command
गुजरात मध्ये नोव्हेंबर – डिसेंबर 2022 मध्ये विधानसभा निवडणुका नियोजित आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातल्या काँग्रेसमध्ये हालचाली तेज झाल्या आहेत. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर काँग्रेसच्या बाजूने गुजरात निवडणुकीत लक्ष घालण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ज्या गुजरात मधून अहमद पटेल काँग्रेसमध्ये केंद्रीय पातळीवर सक्रिय होते, विशेषतः सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय होते त्यांच्या निधनानंतर मात्र काँग्रेसने पटेल कुटुंबीयांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. विशेषतः अहमद पटेल यांचा मुलगा फैजल पटेल याला काँग्रेस हायकमांड करून कोणतेही पद मिळण्याची अपेक्षा होती. परंतु गेल्या कित्येक महिन्यांमध्ये ही अपेक्षा पूर्ण झालेली आहे.
https://twitter.com/mfaisalpatel/status/1511222961771999232?s=20&t=BlRW_ibxiAWQeqFcYLnljw
त्यामुळे गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फैजल पटेल राजकीयदृष्ट्या ऍक्टिव्हेट झाला असून त्याने प्रथमच काँग्रेस हायकमांड वर नाराजी व्यक्त करणारे ट्विट उघडपणे केले आहे. “वाट पाहून मीच थकलो आहे. परंतु काँग्रेसच्या हायकमांडने कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. मी माझे सर्व पर्याय खुले ठेवले आहेत,” असे फैजल पटेल याने आपल्या ट्विटमध्ये आवर्जून नमूद केले आहे.
आम आदमी पार्टीचे आकर्षण
राजकीय वर्तुळात या ट्विटचे वेगवेगळे अर्थ लावण्यात येत असून फैजल पटेल आम आदमी पार्टीच्या दिशेने निघाल्याचे बोलले जात आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाब विधानसभा निवडणुकीतल्या अभूतपूर्व विजयानंतर आपले लक्ष गुजरात वर केंद्रित केले आहे. केजरीवाल यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह गुजरातचा दौरा करून अहमदाबाद मध्ये मोठा रोड शो केला होता. त्याला प्रतिसादही चांगला मिळाला होता. या पार्श्वभूमीवर फैजल पटेल यांची वाटचाल आम आदमी पार्टीच्या दिशेने सुरू झाल्याचे मानण्यात येत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App