जळगाव शहरातील रस्त्यांसाठी 42 कोटी रुपये मंजूर , नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्या ‘ या ‘ महत्वाच्या सूचना


शहरातील रस्त्यांची कामे सूचविण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याच्या सूचनाही शिंदे यांनी यावेळी दिल्या.Rs 42 crore sanctioned for roads in Jalgaon, Urban Development Minister Eknath Shinde gave ‘these’ important instructions


विशेष प्रतिनिधी

मुंबई : जळगाव शहरातील रस्त्यांच्या कामासाठी महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत ४२ कोटी रुपयांचा रस्ते विकास प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांची कामे करताना गुणवत्तेवर भर देऊन दर्जेदार कामे करण्याचे आदेश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी काल (२६ ऑक्टोबर ) दिले.

महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत जळगाव शहरासाठी मंजूर करण्यात आलेल्या रस्ते विकास प्रकल्पाचा काल नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत आयोजित बैठकीत आढावा घेतला.



महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत मंजूर झालेल्या १०० कोटी रुपयांच्या निधीपैकी उर्वरित ५८ कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणी पालकमंत्री पाटील यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली असता महापालिकेने निधी मागणीचा प्रस्ताव तात्काळ नगरविकास विभागाकडे सादर करण्याचे निर्देश यावेळी नगरविकास मंत्र्यांनी दिले.

शहरातील रस्त्यांची कामे सूचविण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याच्या सूचनाही शिंदे यांनी यावेळी दिल्या. या समितीमध्ये जळगावचे जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांचा समावेश असेल. रस्त्यांच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग अंमलबजावणी यंत्रणा म्हणून काम करणार असून रस्त्यांची कामे करताना ते दर्जेदार करण्यावर भर देण्याचे निर्देशही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले.

Rs 42 crore sanctioned for roads in Jalgaon, Urban Development Minister Eknath Shinde gave ‘these’ important instructions

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात