एकनाथ शिंदे शिवसेनेत कंटाळलेत; नारायण राणेंचा राजकीय गौप्यस्फोट


प्रतिनिधी

मुंबई – भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जस जशी जन आशीर्वाद यात्रा पुढे पुढे सरकत आहे, तस तशी ती विविध कारणांनी चर्चेत येत आहे. ही यात्रा शनिवारी वसईत पोहचली. तिथे नारायण राणे मोठा गौप्यस्फोट केला. त्यामध्ये त्यांनी थेट शिवसेनेत भूकंप होईल, असे खळबळजनक वक्तव्य केले आहे. शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेत कंटाळले आहेत, असे वक्तव्य नारायण राणे यांनी केले आहे. त्यामुळे राणेंची ही जन आशीर्वाद यात्रा पालघर जिल्ह्यातही चर्चेला आली आहे. Shiv Sena minister Eaknath Shinde will not remain in Shiv Sena, claims Narayan Rane

नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन मीडियाशी संवाद साधला. यावेळी राणेंनी एकनाथ शिंदे हे शिवसेनेत कंटाळल्याचा दावा केला. ते म्हणाले, की एकनाथ शिंदे हे मंत्री असले तरी ते सही पुरते आहेत. मातोश्रीशिवाय ते एकही सही करू शकत नाहीत. ते कंटाळले आहेत. आमच्याकडे आले तर घेऊ, असे सांगतानाच आम्ही मनात आणले तर लवकरच सरकारचे विसर्जन करू, असा दावाही त्यांनी केला.या वेळी त्यांनी शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. नीलम गोऱ्हे यांना मी शिवसेनेत आणले. माझ्यावर टीका केली की मंत्रिपद मिळते, असा टोलाही त्यांनी लगावला. मुंबई असो वा वसई-विरार. आमच्या हाती सत्ता द्या. आम्ही विकास करून दाखवू, असेही ते म्हणाले.

आम्ही गर्दी वाढवत नाही. लोक गर्दी करत आहेत. काही लोकांना बघून लोक तोंड फिरवतात. आम्ही गाडी भरून माणसं आणत नाहीत. आमच्यासाठी लोक थांबतात. माझ्या आयुष्यात जे पद मिळाले ते लोकांमुळे मिळाले. मला पिंजऱ्यात बसून काही मिळाले नाही. जे काही मिळालं ते जीव धोक्यात घालूनच मिळालं आहे. त्यामुळे पिंजऱ्यात राहणाऱ्यांनी मला सल्ला देऊ नये, असा इशाराही त्यांनी दिला.

Shiv Sena minister Eaknath Shinde will not remain in Shiv Sena, claims Narayan Rane

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था