अहिल्यादेवी जयंती : चौंडीच्या रस्त्यावर पडळकर – खोतांना दोन तास अडवून पवार आजोबा – नातवाचे शक्तिप्रदर्शन!!


प्रतिनिधी

चौंडी : महाराणी अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त पवार आजोबा नातवाने आज त्यांचे जन्मगाव चौंडी मध्ये जोरदार राजकीय शक्तिप्रदर्शन केले. पण हे शक्तिप्रदर्शन करताना भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना चौंडीच्या वेशीवर पोलिसांनी तब्बल दोन तास अडवून धरले होते. त्यामुळे अहिल्यादेवीची जयंती नगर जिल्ह्यातील राजकीय आखाड्याचे केंद्र बनली. rohit pawar made a strong political show in Choundi

– पडळकर, खोतांचा ताफा अडवला

गोपीचंद पडळकर यांनी जेजुरीच्या खंडोबाचे दर्शन घेऊन चौंडीकडे गाड्यांच्या ताफ्यासह कूच केले होते. परंतु शरद पवारांचा आधीच कार्यक्रम तिथे ठरलेला असल्यामुळे पोलिसांनी चौंडीच्या अलिकडेच तो ताफा आडवला. तेथे पडळकर आणि सदाभाऊ खोत यांची पोलिस यांची जोरदार बाचाबाची झाली. पडळकर यांनी शरद पवारांवर होळकरांच्या जमिनी हडपल्याचा आरोप केला. शरद पवारांनी आम्हाला आडवण्यापेक्षा समोरासमोर सभा लावून दाखवावी. बहुजनांची पोरे आजोबा नातवाच्या नातवाच्या छाताडावर नाचतील, अशा शब्दांमध्ये वाभाडे काढले.



– रोहित पवारांची मागणी

तर दुसरीकडे रोहित पवार यांनी आयोजित केलेल्या मेळाव्याला शरद पवारांनी संबोधित केले या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अनेक नेते हजर राहिले. यामध्ये धनंजय मुंडे, दत्तामामा भरणे, जयसिंह होळकर आदींचा समावेश होता. या सभेत रोहित पवारांनी मराठा आणि धनगर आरक्षणाचा मुद्दा प्रश्न मांडला. मराठा आणि धनगर आरक्षण सोडवण्यासाठी शरद पवारांनी दिल्लीत आपले वजन वापरावे, अशी मागणी रोहित पवार यांनी केली.

– रोहितच्या नेतृत्वावर पवारांची स्तुतिसुमने

रोहित पवार यांच्या आमदारकीच्या सुरुवातीलाच यांनी अहिल्‍याबाईंच्‍या विकासाच्या दृष्टीतून अशीच कामे सुरू केली, याची ग्वाही शरद पवारांनी दिली. या दुष्काळी भागात पंतप्रधान इंदिरा गांधी येऊन गेल्या होत्या. परंतु त्यानंतरही कामे झाली नाहीत. दुष्काळ पडला. पण आता रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली विकासाची कामे वेगाने होत असल्याचे शरद पवार म्हणाले.

पण एकूण शरद पवार यांचा कार्यक्रम असल्यामुळे पोलिसांनी गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांचा गाड्यांचा ताफा चौंडीच्या अलिकडेच आडवल्याने तेथे मोठा गदारोळ झाला होता. कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. मात्र पवार यांचा कार्यक्रम संपल्यानंतर लगेच पोलिसांनी पडळकर आणि खोत यांच्यात आपल्याला चौंडी मध्ये जाण्याची परवानगी दिली.

या कार्यक्रमाचे रिपोर्टिंग करताना मराठी माध्यमांची मोठी धांदल उडाली. टीव्ही स्क्रीनच्या अर्ध्या – अर्ध्या या भागांमध्ये मराठी वृत्तवाहिन्यांना शरद पवारांचा कार्यक्रम आणि पडळकर यांचे आंदोलन हे दोघे दोन्ही लाईव्ह चालवावे लागले.

rohit pawar made a strong political show in Choundi

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात