सरकारी भरतीतल्या परीक्षा घोळावरून फडणवीस, पडळकर यांनी काढले ठाकरे – पवार सरकारचे वाभाडे!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : आधी आरोग्य विभागाच्या प्रवेश परीक्षांचा घोळ झाला. पेपर फुटीच्या प्रकरणाचे धागेदोरे प्रकरण महाराष्ट्राच्या आरोग्य संचालनालयापर्यंत पोहोचले. आता म्हाडाच्या परीक्षेत घोळ झाला आहे. हे किती दिवस सहन करायचे?, महाराष्ट्रात सरकार नावाची यंत्रणा अस्तित्वात आहे का नाही?, असा संतप्त सवाल माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

म्हाडाची परीक्षा ऐनवेळेला रद्द करावी लागली. राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मध्यरात्री ट्विटर वर व्हिडिओ शेअर करून परीक्षा रद्द केल्याची घोषणा केली. त्यामुळे या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले. अनेकांपर्यंत तो व्हिडिओ पोचलाच नाही. त्यामुळे परीक्षा केंद्रांवर जाऊन त्यांना निराशा सहन करावी लागली.विद्यार्थ्यांमध्ये या मुद्द्यावरून प्रचंड संताप आहे.विरोधी पक्षांनी देखील या मुद्द्यावरून ठाकरे – पवार सरकारला घेरले आहे. ठाकरे – पवार सरकारला फक्त वसुलीत रस आहे. बहुजनांच्या मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. जितेंद्र आव्हाड हे तर प्रस्थापितांचे हित जपणारेच नेते आहेत, अशा परखङ शब्दांमध्ये भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी वाभाडे काढले आहेत, तर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरद्वारे ठाकरे पवार सरकारचे वाभाडे काढले आहेत.

– देवेंद्र फडणवीस यांची ट्विट अशी

  • – किती दिवस आणि किती वेळा हे सहन करायचे? राज्यात सरकार नावाची यंत्रणा कार्यान्वित होणार आहे की नाही? आज पुन्हा लाखो विद्यार्थ्यांना फटका बसलाय ! नोकरी देऊ शकत नसाल तर किमान त्यांची अशी थट्टा तर करू नका! दोषींवर कठोर कारवाई कराच! पण सरकार म्हणून कुणी याची जबाबदारी घेणार की नाही?
  • – आरोग्य भरती परीक्षेचा घोळ! पेपर फुटीचे धागेदोरे आरोग्य संचालनालयापर्यंत आता म्हाडाच्या परीक्षेतही तेच घोळ, मध्यरात्री परीक्षा रद्द करण्याची वेळ! सरकारी भरतीचा हा बट्ट्याबोळ आणि राज्य सरकार काहीच बोलायला तयार नाही! भ्रष्टाचार, अनास्था आणि निर्लज्जतेचा कळस!

Fadnavis, Padalkar removes Thackeray from government recruitment exams – rent of Pawar government !!

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण