कोरोनाचे संक्रमण हवेतून होण्याचा धोका ; केंद्र सरकारकडून नव्या गाईडलाईन्स

वृत्तसंस्था

मुंबई : कोरोनाचे संक्रमण हवेतून होण्याचा धोका लक्षात घेता केंद्र सरकारने नव्या गाईडलाईन घोषित केल्या आहेत. संसर्ग टाळण्यासाठी या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे महत्वाचे आहे.Risk of corona infection through the air;New guidelines from the central government

केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार विजय राघवन यांच्या कार्यालयाने या गाईडलाईन जारी केल्या आहेत.नवीन गाईडलाईन कोणत्या….

1) हवा खेळती ठेवावी : घरात हवा खेळती असलेल्या ठिकाणी संसर्ग पसरण्याचा धोका कमी असतो. पंखे योग्य ठिकाणी लावा आणि दारे, खिडक्या थोड्या उघड्या ठेवल्यास हवेची गुणवत्ता सुधारते. खिडक्या आणि दारे बंद ठेवून, संक्रमित हवा खोलीत गोळा होत राहते. या मुळे दुसर्‍या व्यक्तीलाही हा संसर्ग पसरण्याचा धोका वाढतो.

2) मास्क वापराच : डबल मास्क किंवा एन -95 मास्क घालावा. सर्जिकल मास्कसह आणखी एक मास्कही घालता येतो. सर्जिकल मास्कच्या जागी दोन सूती मास्क देखील घालू शकता. सर्जिकल मास्क फक्त एकदाच वापरावा.

3) वस्तू कायम स्वच्छ ठेवा: दरवाजाची हँडल, स्विचबोर्ड, टेबल-खुर्च्या अशा अधिक संपर्कात येणार्‍या वस्तू कायम स्वच्छ ठेवल्या पाहिजेत.

4) मध्यवर्ती वातानुकूलन यंत्रणा : इमारतींमध्ये एअर फिल्टरेशन कार्यक्षमता सुधारावी. कार्यालये, सभागृह, शॉपिंग मॉल्समध्ये गॅबल फॅन सिस्टम आणि रूफ  व्हेंटिलेटर्स  वापरा. फिल्टर्सची साफसफाई आणि ते बदलण्याची शिफारस केली आहे.

कोरोना संक्रमण असे होते…

  •  कोरोना रुग्णांचे एअरोसोल्स 10 मीटर दूरवर हवेत पसरू शकतात.
  • रुग्णाचे ड्रॉपलेट्स 2 मीटरपर्यंत पसरू शकतात.
  • कोरोनाबाधित व्यक्तीची लाळ आणि नाकातून शिंकेद्वारे बाहेर पडणारे थेंब बाहेर पडून संसर्ग होतो.
  • बाधित व्यक्ती श्वास घेताना अथवा बोलताना, गाताना, हसताना, खोकताना  कोरोना विषाणू बाहेर पडून संक्रमण वाढते.
  •  कोणतीही लक्षणे नसलेल्या बाधित व्यक्तीकडून कोरोनाचा फैलाव होतो.

Risk of corona infection through the air;New guidelines from the central government

महत्त्वाच्या बातम्या