विशेष प्रतिनिधी
मुंबई – अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होऊन त्याने चक्रीवादळात रूपांतर झाले आहे. परिणामी पुढील ४ दिवसांत मुंबईसह पालघर आणि ठाण्यात पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या सूचनेनुसार अरबी समुद्रात वादळसदृश्य स्थिती निर्माण झाल्याने १६ मे २०२१ रोजी महाराष्ट्र-गोवा राज्याच्या किनाऱ्यावर प्रति तास ४०-४५ ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे व या कालावधीत समुद्र खवळलेला राहील. त्यामुळे मच्छीमार व समुद्रकिनाऱ्यावरील गावांना सावधनतेचा इशारा देण्यात आला आहे. Red alert for fisherman in Mumbai
अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकणातील पालघर, ठाणे आणि रायगडसह मुंबईतील वातावरणावर ही परिणाम होणार आहे. मुंबईत रविवारी हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. शनिवारी (ता.१५) ठाणे आणि रायगड जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे; तर रविवारी (ता. १६) रायगडमध्ये पावसाची शक्यता आहे. काही भागात वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याचे कुलाबा वेधशाळेने म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App