विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण मोहिमेंतर्गत, मुंबई महापालिकेच्यावतीने शुक्रवारी मुंबईतील सर्व शासकीय आणि महापालिका कोविड-१९ लसीकरण केंद्रांवर फक्त महिलांसाठी राखीव असे विशेष लसीकरण सत्र राबवले गेले. त्यात एकूण १ लाख २७ हजार ३५१ महिलांना लस दिली गेली. ह्यात महिलांना थेट येऊन (वॉक इन) कोविड लसीचा पहिला किंवा दुसरा डास घेण्याची मुभा देण्यात आली होती. Record vaccination of women on the same day in Mumbai on Prime Minister Modi’s birthday
मुंबईतील सर्व २२७ प्रभागांमधील लसीकरण केंद्र आणि त्यासोबत सर्व शासकीय व महापालिका रुग्णालये आणि कोविड सेंटर येथील लसीकरण केंद्रांवर थेट येऊन (वॉक इन) महिलांना कोविड लस घेता येणार होती. त्यामुळे महिलांनी सर्वच केंद्रांवर मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.
सकाळी १०.३० ते सायंकाळी ६.३० ह्या वेळेत राबवलेल्या या मोहिमेत महापालिका आणि शासकीय लसीकरण केंद्रांत १ लाख २७ हजार ३५१ महिलांनी लस घेतली. त्यामुळे एकाच दिवशी झालेल्या लसीकरणाची ही विक्रमी नोंद महिलांनी केली आहे. त्यामुळे महिला वर्गाकडून महापालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, कार्यकारी आरोग्य अधिकारी आणि विभागाच्या संबंधित नगरसेवकांचे विशेष आभार मानले जात होते. महापालिकेच्या २२७ वॉर्डांच्या नगरसेवकांनी याबाबत महिलांमध्ये जनजागृती केल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात लसीकरण पार पडल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App