वृत्तसंस्था
मुंबई : मुंबईत रिअल इस्टेटला सुगीचे दिवस गेल्या वर्षी आल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. खऱ्या अर्थांत रिअल इस्टेटने मुंबईत झेप घेतली आहे. कारण मालमत्ता खरेदीत विक्रम झाला आहे. एक लाखांपेक्षा अधिक मालमत्ता खरेदी विक्रीचे व्यवहार झाले आहेत. Real estate leaps in Mumbai, record in property purchases, more than one lakh transactions
नाईट फ्रँकने केलेल्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षी मुंबईत १ लाख ११ हजार ५५२ खरेद विक्रीच्या व्यवहारांची नोंद झाली आहे. २०२० च्या तुलनेत ही वाढ मोठी असल्याचे नाईट फ्रँकने म्हटले आहे. नाईट फ्रँक ही देशातील अग्रगण्य रिअल इस्टेट कन्सल्टन्सी कंपनी आहे. २०२० च्या तुलनेत मुंबईत खरेदी विक्रीच्या व्यवहारात ७० टक्क्यांची वाढ झाली. तर कोरोना महामारीच्या पूर्वी म्हणजे २०१९ या वर्षापेक्षा ४५ टक्क्यांची वाढ गेल्या वर्षी व्यवहारात झाली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App