बाल वेठबिगारी करून घेणाऱ्यांना राज ठाकरेंचा मनसे स्टाईल कारवाईचा गंभीर इशारा!


प्रतिनिधी

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातल्या ठाणे, नगर, नाशिक, आदी जिल्ह्यांमधून वेठबिगारीच्या विशेषतः बाल वेठबिगारीच्या बातम्या येत आहेत. या मुद्द्यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेला उद्देशून पत्र लिहून या प्रथेविरुद्ध आवाज उठवण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर लहान मुलांकडून वेठबिगारी करवून घेणाऱ्यांना आवश्यकता भासल्यास मनसे स्टाईल धडा शिकवण्याचा इशारा देखील राज ठाकरे यांनी या पत्रात दिला आहे. राज ठाकरे यांचे हे पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहे. Raj Thackeray’s serious warning of MNS style action to child molesters

राज ठाकरे यांचे पत्र असे :

गेल्या काही दिवसांपासून, विविध वर्तमानपत्रांमध्ये लहान मुलांना वेठबिगारी करण्यास भाग पाडलं जातंय, अशा आशयाच्या बातम्या वाचल्या. ह्या बातम्या मन विषण्ण करणाऱ्या आहेत.

नाशिक, नगर, ठाणे, पालघर अशा जिल्ह्यांमध्ये वेठबिगारीचे प्रकार समोर येत आहेत. पैशासाठी मुलांवर वेठबिगारीची वेळ यावी, हे भीषण आहे. आज कायद्याने वेठबिगारीचं उच्चाटन झालं असलं तरी ही प्रथा अस्तित्वात आहे, आणि प्रगत म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात ह्या घटना आढळणं हे राज्याला शोभणारं नाही.

राज्य सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना ह्या घटनांचा छडा लावण्याचे निर्देश तात्काळ द्यायला हवेत. वेठबिगारांचा शोध, सुटका आणि पुनर्वसन ह्याकडे संपूर्ण प्रशासनाने कमालीच्या सहानुभूतीने लक्ष द्यायला हवं.

पण हे करताना एकूणच जागृत समाजाने पण पुढे यायला हवं. वेठबिगारी ही क्रूर प्रथा आहे, आणि तिच्या निर्मूलनासाठी समाजात सतर्कता हवी. असे प्रकार तुम्हाला कुठेही आढळले तर तुम्ही पोलिसांची तक्रार करा किंवा जवळच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयाला किंवा माझ्या कोणत्याही महाराष्ट्र सैनिकाला सूचित करा, ते कायदेशीर मदत घेऊन कारवाई तर करतीलच. पण गरज पडलीच तर वेठबिगारी करून घेणाऱ्यांना महाराष्ट्र सैनिक आपल्या पद्धतीने धडा पण शिकवतील. ह्या बातम्या परत कधीच वाचायला लागू नयेत हीच इच्छा.

Raj Thackeray’s serious warning of MNS style action to child molesters

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती