Raj Thackeray : मनसेमध्ये मतभेदाच्या माध्यमांच्या बातम्या, पण मशिदींवरील भोंग्यांविरुद्ध मनसे कोर्टात जाणार!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात केलेल्या भाषणात मशिदींवरील भोंग्याविरुद्ध जोरदार आवाज उठवला. त्यानंतर या मुद्द्यावरुन राज्यभरातील मनसैनिक आक्रमक झाल्याचे पहायला मिळत असताना पुण्यातील शहर प्रमुख वसंत मोरे यांच्या मतभेदाच्या बातम्या मराठी माध्यमे लावून धरत आहेत. या पार्श्वभूमीवर मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी आता मनसे मुंबई हायकोर्ट याचिका दाखल करणार असल्याचे संकेत मनसेच्या कायदे विभागाचे प्रमुख अ‍ॅड. किशोर शिंदे यांनी दिले आहेत. तसेच मनसेचे वरिष्ठ नेते आणि माजी आमदार बाळा नांदगांवकर यांनी देखील याबाबत सूचक वक्तव्य केले आहे. Raj Thackeray: Media reports of differences in MNS, but MNS will go to court against noise in mosques !!

राज ठाकरेंनी बोलावली बैठक

भोंग्यांविरुद्ध आता मनसे मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्याच्या विषयावर चर्चा करण्यासाठी राज ठाकरे यांनी गुरुवारी मुंबईत बैठक बोलावली आहे. या बैठकीत देशभरातील कोणत्या राज्यांत मशिदींवरील भोंग्यांच्या संदर्भात न्यायालयाने नेमके काय आदेश दिले आहेत, त्याचा आढावा मनसैनिकांकडून घेण्यात येणार आहे.

राज ठाकरे निर्णय घेतील : नांदगांवकर

सुप्रीम कोर्ट, उत्तराखंड, अलाहाबाद उच्च हायकोर्ट यांनी याबाबतचे निर्णय दिले आहेत. त्यामुळे या सगळ्याचा आढावा आजच्या बैठकीत घेण्यात येणार आहे. त्यानंतर राज ठाकरे आपली योग्य ती भूमिका सर्वांसमोर मांडतील, असे संकेत मनसेचे वरिष्ठ नेते बाळा नांदगांवकर यांनी केले आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या आजच्या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.मनसे आक्रमक

राज ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार, मनसैनिकांनी राज्यात अनेक ठिकाणी मशिदींवरील भोंग्यांच्या समोर हनुमान चालिसा लावायला सुरुवात केली आहे. त्यामुळे राज ठाकरे हे सामाजिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप सत्ताधा-यांकडून करण्यात येत आहे. पण आता मनसे यावरुन आक्रमक झाली असून, या मुद्द्यावर कायदेशीररित्या आवाज उठवण्याचा निर्णय घेण्याची तयारी मनसेने दर्शवली आहे.

मात्र मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर मराठी माध्यमे पुणे शहर प्रमुख वसंत मोरे यांच्या संदर्भात बातम्या देत आहेत. वसंत मोरे राष्ट्रवादीत जाण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या मतदारसंघात मुसलमानांची मतदार संख्या निर्णायक ठरते. त्यामुळे वसंत मोरे यांना राजकीय निर्णय घेण्यापासून पर्याय नाही, अशा बातम्या मराठी चॅनेल्स देत आहेत. अधिकृतरीत्या वसंत मोरे नेमकी काय भूमिका घेतात अद्याप कोणी सांगितलेले नाही.

Raj Thackeray : Media reports of differences in MNS, but MNS will go to court against noise in mosques !!

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण