टीईटी गैरव्यवहार प्रकरणात सायबर गुन्हे शाखेकडून दोघांना अटक


शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहार (टीईटी) प्रकरणात पुणे सायबर गुन्हे शाखेने दोघांना अटक केली आहे. या प्रकरणात अटक केलेल्या दोघा आरोपींनी अपात्र उमेदवारांना पात्र करण्यासाठी आरोपी स्वप्नील पाटील तसेच संतोष हरकळ यांना पैसे दिल्याचे तपासात उघड झाले आहे. TET exam two more accused arrested by Pune cyber police team


विशेष प्रतिनिधी

पुणे – शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहार (टीईटी) प्रकरणात पुणे सायबर गुन्हे शाखेने दोघांना अटक केली आहे. या प्रकरणात अटक केलेल्या दोघा आरोपींनी अपात्र उमेदवारांना पात्र करण्यासाठी आरोपी स्वप्नील पाटील तसेच संतोष हरकळ यांना पैसे दिल्याचे तपासात उघड झाले आहे. म्हाडा परीक्षा घोटाळ्यात सदर दोन आरोपींना अटक करण्यात आले होते आणि आता त्यांना टीईटी प्रकरणात पोलिसांनी वर्ग करून घेतले आहे.

कलीम गुलशेर खान (वय ५२, रा. हनुमान मंदिर, बुलढाणा), राजेंद्र विनायक सोळुंके (वय ५२, रा. नांदगाव, जि. नाशिक) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे. राज्य परीक्षा परीषदेचे अध्यक्ष दत्तात्रेय गोविंद जगताप यांनी गैरव्यवहार प्रकरणात सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
स्वप्नील पाटील याने दलालांमार्फत १५० अपात्र उमेदवारांची माहिती मिळवली होती. त्याने अपात्र उमेदवारांची यादी दलाल संतोष हरकळ याच्याकडे दिल्याचे तपासात उघडकीस आले होते.राजेंद्र सोळुंकेने ४० अपात्र उमेदवारांना पात्र करण्यासाठी पाटील याला पैसे दिले होते. तसेच यादीही दिली होती. आरोपी कलीम खानने राज्यातील ६५० अपात्र उमेदवारांची यादी आरोपी हरकळ याला दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे. खान याने एक कोटी रुपये हरकळ याला दिल्याचे पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.या गुन्ह्याच्या तपासासाठी आरोपी खान, सोळुंके यांना पोलीस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी न्यायालयाकडे केली. न्यायालयाने दोघांना सात एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

TET exam two more accused arrested by Pune cyber police team

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण