Ajit Pawar – Jarandeshwar : जरंडेश्वर कारखाना शेतकऱ्यांच्या ताब्यात द्या किरीट सोमय्यांची ईडी कडे मागणी!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर साखर कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बेनामी पद्धतीने ताब्यात घेतला. त्यावर कोर्टाने निकाल दिला. आता हा कारखाना पुन्हा मूळ मालक असलेल्या 27 हजार शेतकऱ्यांच्या ताब्यात द्या अशी मागणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या कार्यालयात जाऊन केली आहे. Hand over Jarandeshwar factory to farmers Kirit Somaiya’s demand to ED !!

मुंबईतील कैसर-ए-हिंद बिल्डिंगमध्ये कार्यालयात किरीट सोमय्या शेतकरी सभासदांचे जाऊन पोहोचले आणि त्यांनी जरंडेश्वर साखर कारखान्याचा ताबा कायदेशीररित्या कोर्टाच्या आदेशानुसार 27 हजार शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींच्या ताब्यात द्यावा, अशी मागणी केली. यावेळी किरीट सोमय्या यांच्या बरोबर जरंडेश्वर कारखान्याचे काही सभासद शेतकरी देखील होते.जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना हा आधी दिवाळखोरीत आणला आणि नंतर अजित पवार यांच्या नातेवाईक असतील नातेवाईकांनी गुरु कमोडिटीज या कंपनीमार्फत अल्प किंमतीला विकत घेतला. याबाबत हायकोर्टाने घोटाळा कोर्टाने घोटाळा झाल्याचे मान्य करून कारखान्याच्या जप्तीची कारवाई वैध असल्याचा निकाल दिला. आता कारखाना जप्तीची कारवाई होऊन तो कारखाना पुन्हा एकदा कारखान्याचे मूळ मालक असलेल्या 27000 सभासद शेतकऱ्यांच्या ताब्यात द्यावा, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी सभासद शेतकऱ्यांसह ईडीच्या कार्यालयात जाऊन केली आहे.

Hand over Jarandeshwar factory to farmers Kirit Somaiya’s demand to ED !!

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात एकही कोरोना रुग्ण रुग्णालयात दाखल नाही ; पुणे शहरात 98 रुग्ण गृह विलगीकरणात

टीईटी गैरव्यवहार प्रकरणात सायबर गुन्हे शाखेकडून दोघांना अटक

मुर्तझा अब्बासी जिहादी शिकवण्या तयार करत होता

न्यायमूर्तींना खासगी परदेशी प्रवासासाठी सरकारी परवानगी कशाला?; केंद्र सरकारचा आदेश दिल्ली उच्च न्यायालयाकडून रद्द

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय