Raj Thackeray : पुण्यात नुरानी कबरस्तान मध्ये राज ठाकरेंच्या नावाला फासले काळे!!


 

प्रतिनिधी

पुणे : मशिदींवरचे भोंगे काढण्याचा वाद आता आणखी पेटला असून पुण्याच्या कोंढव्यातील नुरानी कब्रस्तानचा भूमिपूजनाचा कार्यक्रम राज ठाकरे यांच्या हस्ते झाला होता. राज ठाकरे यांच्या नावाला काळा रंग लावून स्थानिक लोकांनी त्यांचा निषेध दर्शवला आहे. मशिदीवरील भोंग्यांसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून मुसलमानांमध्ये नाराजी असल्याचे समोर आले आहे.Raj Thackeray: Raj Thackeray’s name spilled in Nurani cemetery in Pune

राज ठाकरे यांनी मुसलमानांच्या भावना दुखावल्याने पुण्यात याधीच मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. तर दुसरीकडे पुण्यात मनसेने पोलीस आयुक्तांना पत्र लिहून चार दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. चार दिवसात भोंगे न काढल्यास पुण्यात दुप्पट भोंगे लवून हनुमान चालिसा म्हणणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, पुण्यात काही मुसलमानांनी राज ठाकरे यांनी उद्घाटन केलेल्या कब्रस्तानावर असलेले राज ठाकरे यांच्या नावाना काळा रंग लावला. राज ठाकरे यांच्या निर्णयाचा निषेध त्यांनी नोंदवला आहे.



  • मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन खळखट्याक!

मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन मनसेचे पुणे शहरात खळखट्याक उडणार का असा सवाल उपस्थित होत आहे. डेक्कन परिसरातील सर्व मशिदीवरील अनधिकृत भोंगे काढण्याबाबत मनसेने पत्र दिले आहे. यासंदर्भात पुणे शहर मनसेकडून शहरातील पोलीस स्टेशनला पत्र लिहिले आहे.

डेक्कन पोलीस स्टेशन, विश्रामबाग, फरासखाना पोलीस स्टेशनला पत्र दिले आहे. मनसेने या मशिदींना भोंगे काढण्यासाठी चार दिवसाचा अल्टीमेटम दिला आहे. भोंगे न काढल्यास दुप्पट भोंगे लावून हनुमान चालीसाचे पठण करणार असल्याची माहिती राज्य सरचिटणीस हेमंत संभूस यांनी दिली आहे.

Raj Thackeray: Raj Thackeray’s name spilled in Nurani cemetery in Pune

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात